चित्रा न्युज प्रतिनिधी
उदगीर :-येथे उदगीर पोलीस उपविभागीय अधिकारी(DYSP) आदरणीय गजाननजी भातलवंडे साहेब यांचा दि. 17 ऑगस्ट रोजी उपविभागीय कार्यालय उदगीर येथे लातूर जिल्हा पोलीस पाटील संघटने तर्फे यथोचित सत्कार करण्यात आला.यांना त्यांच्या उत्कृष्ट व गुणवत्तापूर्ण आणि निष्कलंक सेवे बद्दल महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार लातूर जिल्ह्याचे पालक मंत्री श्रीमान शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते 15 ऑगस्ट रोजी स्वतंत्रदिनाच्या औचित्यांवर लातूर येथे प्रदान करण्यात आला त्यां बद्दल बोलताना पोलीस पाटील संघटनेचे लातूर जिल्हाध्यक्ष भालचंद्र शेळके पाटील म्हणाले कि हा पुरस्कार म्हणजे एक इमानदार व आपल्या सेवेशी प्रामाणिक असलेल्या अधिकाऱ्याचा सन्मान आहे आणि त्यां बद्दल लातूर जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांना याचा आंनद झाला आहे असे मत व्यक्त केले. यावेळी मराठवाडा कार्यकारी अध्यक्ष विश्वास नरले पाटील यांच्या नेतृत्वात लातूर जिल्हा पोलीस पाटील संघटने तर्फे आदरणीय गजाननजी भातलवांडे साहेब यांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी लातूर जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष भालचंद्र शेळके पाटील, लातूर जिल्हा महिला आघाडीच्या अध्यक्षा सौ ज्योतीताई बिरादार, तसेच उदगीर तालुका अध्यक्ष धनराज तौर पाटील,तालुका संघटक अंकुश चव्हाण पाटील, तालुका सहसंघटक गजानन धनशेट्टे पाटील , तालुका सहसचिव रामराव कांबळे पाटील, तालुका कोषाध्यक्ष राजाराम राठोड पाटील,पुंडलिक सूर्यवंशी पाटील बिरादार पाटील उपस्थित होते


0 टिप्पण्या