सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज मो.9921927894
अमरावती : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तसेच पी. आर. पोटे पाटील अभियांत्रिकी व व्यवस्थापन महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या रोजगार मेळाव्यात 239 सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांची विविध पदांवर प्राथमिक निवड करण्यात आली. या मेळाव्याला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्यामध्ये ऑनलाईन व ऑफलाईन अशा 640 उमेदवारांनी सहभाग नोंदविला होता. त्यापैकी 410 उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखती दिल्या. मुलाखती दिलेल्या उमेदवारांपैकी 239 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली.
जिल्हा नियोजन अधिकारी वर्षा भाकरे यांच्या अध्यक्षतेखाली या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. उपायुक्त सुनील काळबांडे, सहायक आयुक्त प्रफुल शेळके, प्राचार्य, डॉ. डी. इंगोले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
मेळाव्यामध्ये पियाजिओ व्हेईकल्स प्रा. लि., बारामती तसेच पुणे, स्थापत्य कन्सलटंन्स प्रा. लि. अमरावती, गोल्डन फायबर लिमिटेट, नांदगाव पेठ, द युनिवर्सल ग्रुप असोसिएट्स, नागपूर या नामांकित खाजगी आस्थापनेच्या प्रतिनिधींनी उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. शेळके यांनी केले. संचालन पी. आर. पोटे पाटील महाविद्यालयाचे सुहास पवार यांनी तर आभार कौशल्य विकास अधिकारी वैशाली पवार यांनी मानले.


0 टिप्पण्या