धम्मदिप साखरे लाखांदूर तालुका प्रतिनिधी मो.8698390104
लाखांदूर:-सूर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लाखांदूर येथे दि.१२/१२/२०२२ सोमवार आयोजित भव्य संमेलनामध्ये भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील हजारोच्या संख्येने बौद्ध अनुयायाची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक आदरणीय राजरत्न आंबेडकर यांनी चंद्रकांत पाटलांचा जाहीर निषेध केला. (बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,कर्मवीर भाऊराव पाटील यांनी भीक मागून शाळा कॉलेज बांधले असे वक्तव्य केले होते.)बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सूर्यासारखे आहेत जर सूर्य वर थुंकण्याचा प्रयत्न केला तर ती थुंकी त्यांच्याच तोंडावर पडेल. अशाच प्रकारचे काळी शाही (थुंकी) चंद्रकांत पाटलाच्या तोंडावर पडलेली आहे. शाही तोंडावर फेकणाऱ्या त्या समता सैनिक दलाच्या सैनिकाचा समर्थन करून एक लाखाचा धनादेश जाहीर केला. हे काम आम्हाला करायचे होते ते काम समता सैनिक दलाच्या सैनिकाने केले. त्याबद्दल आंबेडकरी कुटुंब आभारी आहे. असे आ. राजरत्न आंबेडकर यांनी जाहीर केले.
राजरत्न आंबेडकर यांनी हजारोच्या संख्येने उपस्थित असलेल्या बौद्ध अनुयायांना 22 प्रतिज्ञा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदरणीय इंजिनियर महेंद्रजी बारसागडे सर यांनी केले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र पाल गौतम माजी मंत्री दिल्ली संचालन मनोज भाऊ बनसोड युवा सामाजिक कार्यकर्ता तसेच या कार्यक्रमाला सर्व मान्यवर उपस्थित होते.


0 टिप्पण्या