रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५
बुलढाणा :-वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये,सातत्याने महाराष्ट्र सरकारने आदिवासी कोळी महादेव जमातीला वेठीसधरुण संविधानीक अधिकार असुनसुध्दा त्या मिळालेला संविधानिक अधिकारापासुन वंचित ठेवण्याचे काम सातत्याने महाराष्ट्र सरकार करत आहे.त्या अनुशंघाने आज आदिवासी कोळी महादेव जमातीचा मेळावा बुलढाणा येथे समर्पन मेळावा संपन्न झाला.
या प्रसंगी आदिवासी कोळी महादेव जमातीवर होत असलेल्या अन्याय आत्याच्यारा बाबत सखोल असे मार्गदर्शन करुण आदिवासी कोळी महादेव जमात ही शासनकर्ती जमात झाली पाहीजे असे आवाहन श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर यांनी केले.
या मेळाव्यचे आयोजन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष निलेश जाधव यांनी केले होते.
यावेळी मंचकावर भारिप बहुजन महासंघांचे प्रदेशाध्यक्ष मा.अशोकभाऊ सोनोने, मा.धैर्यवर्धनजी पुंडकरसर, मा.प्रदिपजी वानखेडे, सौ.सविताताई मुंढे, मा.गणेशभाऊ इंगळे, गंगाधर तायडे, मा.विष्णुभाऊ जाधव मा.भागवत गवळी, मा.सोनोनेसर, नामदेव सुरळकर मंचकावर उपस्थित होते.
या समर्पन मेळाव्याला आदिवासी कोळी महादेव जमातीच्या उपस्थित असलेल्या बांधवानी स्व:ताहा पदरमोड करुण व कोनतीही अपेक्षा न ठेवता निस्वार्थी पणे उपस्थित दर्शवली हीच आहे.परिवर्तनाची नांदी.


0 टिप्पण्या