कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324
भंडारा :-लाखनी येथील जिल्हा परिषद गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयात समग्र शिक्षा अभियान व नॅशनल स्किल क्वॉलिफिकेशन फ्रेमवर्क अभ्यासक्रमाअंतर्गत इलेक्ट्रॉनिक्स व्यावसायिक अभ्यासक्रमाची सुरुवात शैक्षणिक वर्ष २०२० पासून करण्यात आलेली आहे.
विद्यार्थ्यांना रोजगाराचे कौशल्ये वाढविण्यासाठी इयत्ता १२वी च्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप कार्यशाळा अनिकेत वंजारी व शिवशंकर गायधने यांच्या लाखनी वर्कशॉप मध्ये सुरू करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने थेअरी व प्रात्यक्षिकाचे धडे विद्यार्थ्यांना दिले जातात. सदर अभ्यासक्रमाचे विभाग प्रमुख रजत गायधनी असून, महाविद्यालयाचे प्राचार्य रवी मेश्राम यांच्या मार्गदर्शनाखाली इंटर्नशिप अभ्यासक्रम सुरू करण्यात आलेले आहे. असे प्राध्यापक आर. वाय. खोब्रागडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.


0 टिप्पण्या