Ticker

6/recent/ticker-posts

६६ व्या महापरिनिर्वाण दिन दिनानिमित्त महामानवाला अभिवादन !

धम्मदिप साखरे लाखांदूर तालुका प्रतिनिधी  मो.8698390104                                                                             

लाखांदूर:-डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दिघोरी/मोठी तर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करण्यात आली.                                        

फक्त भारत देशातच नाही तर अवघ्या विश्वात समाज कल्याणासाठी आपल्या विचारांची व कार्यांची पेरणी करणाऱ्या बाबासाहेबांचं महापरिनिर्वाण डिसेंबर 1956 साली 6 तारखेला झालं, त्या प्रित्यर्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने बाबासाहेबांना आदरांजली अर्पण करण्यात आली. मानवंदना देण्यात आली.या वेळी शेकडोंच्या संख्येने  बाबासाहेबांचे अनुयायी उपस्थित होते.

महापरिनिर्वाण तत्व व देय आहे, बौद्ध धम्मानुसार जो निर्वाण प्राप्त करतो तो सांसारिक वासना, जीवनातील वेदना तसेच जीवन चक्रातून मुक्त होतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अनेक वर्षे बौद्ध धर्माचा अभ्यास करून 1956 मध्ये लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्म स्वीकारला त्यांच्या महान विचार व कार्यामुळे त्यांच्या स्मुर्तिदिनी महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

या कार्यक्रमाप्रसंगी अनेक वक्त्यांनी आपल्या वक्तव्यातून बाबासाहेबांचे विचार पेरण्याचे कार्य केले, बाबासाहेबांचे विचार फक्त ऐकण्यापेक्षा कृतीत आणल्या पाहिजे असे मोलाचे मार्गदर्शन समितीचे अध्यक्ष धम्मदिपजी साखरे यांनी केले.

कार्यक्रमाप्रसंगी हरीश टेलर्स, मनसुख वालदे, शिवनंदन राऊत, प्रेमानंद गोसावी, अरविंद जांभुळकर, सुरेश भैसारे, आशिष चिमनकार, संजय भैसारे, मिलिंद नंदागवली, इंदूताई बारसागडे, भावनाताई गेडाम, विमलताई वैद्य, यशोधराताई शहारे इत्यादी बौद्ध अनुयायी तथा ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या