लिंगोजी कदम :-जिल्हा प्रतिनिधी ग्रामिण नांदेड मो :-9689821132
किनवट : येथील बळीराम पाटील महाविद्यालयातील तहसील कार्यालय किनवट व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त २०२४ च्या सार्वत्रिक निवडणूका डोळ्यासमोर ठेवून लोकशाही मजबूत वबळकट करण्यासाठी व युवकांना मतदान प्रक्रियेत सहभागी करण्यासाठी मी भारताचा नव मतदार कार्यक्रम संपन्न करण्यात आला आहे.
यावेळी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस.के.बेंबरेकर हे लाभले होते. तर प्रमुख पाहुणे किनवट तहसील चे स्वामी साहेब,मनोज कांबळे उपप्राचार्य डॉ. जी.एस.वानखेडे पर्यवेक्षक प्रा.अनिल पाटील रासेयो कार्यक्रम आधिकारी प्रा शेषराव माने उपस्थिती होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रनिर्माते संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
तहसील येथील प्रमुख पाहुणे स्वामी साहेब यांनी विद्यार्थ्यांना मतदान फार्म कसा भरावा त्यासाठी कोणकोणते डाक्युमेंट्स लागतात व आँनलाईन फार्म कसा भरावा याविषयी सखोल आसे मार्गदर्शन केले. तदनंतर अध्यक्षीय समारोप महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. एस.के.बेंबरेकर यांनी केला. तसेच सूत्रसंचालन कार्यक्रमाचे आयोजक राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा.शेषराव यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रा. सुलोचना मँडम यांनी मानले.
या प्रसंगी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थीनी तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.


0 टिप्पण्या