रुपाली मेश्राम कार्य.संपादिका चित्रा न्युज मो.९५५२०७३५१५
परभणी : भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या परभणी महानगर दौर्या दरम्यान आंबेडकरवादी संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काळे झेंड दाखवून ताफा अडविण्याचा प्रयत्न केला.
वसमत रस्त्यावर वसंतराव नाईक यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात आंबेडकरवादी विविध संघटनांच्या पदाधिकार्यांनी भाजपाच्या मंत्र्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा ताफा अडविण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी या कार्यकर्त्यांना मागे ढकलले, त्यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत काळे झेंडे दाखविले. त्याद्वारे आपला तीव्र रोष व्यक्त केला. चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपाच्या अन्य मंडळींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतीबा फुले व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध केला.
या दरम्यान कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.


0 टिप्पण्या