संतोष मगदूम सांगली जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी मो.9146963985
मणिपूर -: माणुसकीला काळिमा फासणाऱ्या मणिपूर येथील हिंसाचारात आदिवासी महिलांवरती झालेल्या अमानुष अत्याचाराविरोधात विरोधात आज आम आदमी पार्टी तर्फे राजवाडा चौक, सांगली पासून महात्मा गांधी स्मारक, स्टेशन चौक इथपर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला.
भाजपातर्फे सध्या भारतात अराजकतेचे माहोल हे जाणून बुजून पसरवले जात असून यामुळे प्रत्येक राज्यात कमीजास्त प्रमाणात हिंसाचार होत असल्याचे दिसून येत आहे. देशाला जगासमोर मान खाली घालावी लागणारी घटना घडून देखील देशाचे पंतप्रधान हे खुशाल परदेशागमन करीत आहेत. गेले दोन महिने संपूर्ण हिंसाचार मणिपूरमध्ये उफाळला असून ना तेथील राज्य सरकारचे वा केंद्र सरकारने अध्याप त्यावर नियंत्रण मिळवले नसल्याने दिवसेंदिवस तेथील परिस्थिती चिघळत चालली आहे. मणिपूर येथील सामान्य लोकांवर होणारे अत्याचार त्वरित थांबावेत व दोषीवर कठोर कारवाई व्हावी अशी आम आदमी पक्षाची मागणी असून आज संपूर्ण राज्यभर आम आदमी पार्टीतर्फे कॅण्डल मार्च काढण्यात येत आहे अशी माहिती राज्य समिती सदस्य व कोल्हापूर विभाग प्रमुख श्री. संदीप देसाई यांनी पत्रकारांना संबोधित करताना सांगितले.
आजच्या या कॅण्डल मार्चमध्ये माजी पश्चिम महाराष्ट्र सचिव वसीम मुल्ला, जिल्हा समन्वयक डॉ.अमोल पवार, सांगली जिल्हा ग्रामीण समिती, अध्यक्ष श्री.राम पाटील, सांगली जिल्हा शहर समिती अध्यक्ष श्री.आरिफ मुल्ला, अजित कांदेसार, विवेक भिंगारदिवे, भगवंत पाटील, संभाजी मोरे, संतोष मगदूम,निसार मुल्ला, शिवाजी गायकवाड, रवि बनसोडे, श्रीकांत चंदनवाले व मोठ्या संखेने अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.


0 टिप्पण्या