Ticker

6/recent/ticker-posts

मिरजेतील अस्वल मळा येथील नागरिकांच्या मूलभूत गरजा महानगरपालिका पूर्ण करून न शकल्यामुळे स्थानिक नागरिक अस्वस्थ


संतोष मगदूम सांगली जिल्हा प्रतिनिधी
मो.9146963955

मिरज -: मिरजेतील अस्वले मळा येथील नागरिकांच्या मूलभूत गरजा पुरविण्याबाबत गेली दीड वर्षे आम् आदमी पार्टी महापालिकेस निवेदने, आंदोलनाद्वारे लढा देत आहे मात्र महापालिका अधिकारी जुजबी आश्वासने करून त्यांच्या प्रश्नांवर काहीच उपाययोजना करीत नाहीत. यामुळे शेवटी जिल्हाधिकाऱ्यांना महानगर पालिकेत सुरू असलेल्या भोंगळ कारभारा विरोधात तक्रार केली असता त्यांनी महापालिका आयुक्तांना याबाबत खुलासा करण्यासंबंधी पत्र पाठविले असता अद्याप महापालिकेकडून याबाबतचा खुलासा दिला गेला नाही. सध्या पडणाऱ्या प्रचंड पावसामुळे अस्वले मळा येथील रहिवाशांचे अतोनात हाल होत आहेत. येथील रहिवाशांना हक्काचा रस्ता उपलब्ध नसल्याने त्यांना एका खाजगी प्लॉट मधून येणे जाणे करावे लागते. वरील भागातील गटारीचे सांडपाणी येथे जमा होत असल्याने असणारा पर्यायी रस्ता देखील पाण्यामध्ये गेला आहे. त्यात पावसाचे पाणी साचून अस्वले मळ्यास तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. रस्ता नसल्याने महापालिकेची घंटा गाडी व औषध फवारणी करणारी गाडी येथे पोहचत नाही. यामुळे सर्वत्र कचरा व उपद्रवी कीटक यांच्यमुळे गंभीर रोगराई पसरत आहे. नागरिकांच्या इतक्या समस्या असताना देखील प्रशासन झोपी गेले आहे. आता जर लवकर महापालिकेने यावर उपाय योजना केली नाही तर येथील रहिवासी मिरज महानगरपालिकेत मुक्काम ठोकणार असल्याचा इशारा आम् आदमी पार्टीचे सांगली जिल्हा शहर समिती अध्यक्ष श्री.आरिफ मुल्ला यांनी दिला आहे. त्यांच्यासोबत रवी बनसोडे, संभाजी मोरे, इमरान पठाण, संतोष मगदूम तसेच स्थानिक नागरिक योगेश अस्वले हे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या