Ticker

6/recent/ticker-posts

💐 || सुमंगल सुप्रभात || 💐‌ 🌞 दिन विशेष 🌞

💐  || सुमंगल सुप्रभात ||  💐
‌          🌞 दिन विशेष  🌞
‌
‌इसवी सन २०२३ - २६ जुलै 
‌शालिवाहन शक १९४५, विक्रम संवत  २०७९
‌भा. रा. ४ श्रावण १९४५.
युगाब्द ५१२५
संवत्सर नाम : शोभन
अयन : दक्षिणायन
ऋतू :   वर्षा
मास :  अधिक श्रावण  
पक्ष :   शुक्ल                
तिथी : अष्टमी (१५.५०) ~ नवमी 
वार :   बुधवार 
नक्षत्र : स्वाती (२५.१०) ~ विशाखा      
राशी :   तुला 

*बुधाष्टमी*
*दुर्गाष्टमी* 

*राष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिन*

*विजय दिन* : भारत 
(कारगिल युद्धाची समाप्ती)
*कारगिल युद्ध*
कारगीलचे युद्ध हे भारत व पाकिस्तान यांच्या दरम्यान इ.स. १९९९ च्या उन्हाळ्यात लढले गेलेले मर्यादित युद्ध होते. या युद्धाची व्याप्ती भारताच्या कारगील व आजूबाजूच्या परिसरापुरतीच मर्यादित राहिली. 
इ.स. १९९९ च्या उन्हाळ्यात, पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठाणी कब्जा केल्याचे भारताच्या लक्षात आले व या घुसखोरांना हुसकावण्यासाठी कारगीलचे युद्ध सुरू झाले. ही ठाणी कारगील व द्रास परिसरातील अतिउंच दुर्गम जागी होती. अनेक महिन्यांच्या प्रयत्‍नांनंतर भारताला ही ठाणी परत मिळवण्यात यश मिळाले.

१५०९: सम्राट कृष्ण देव राय याने विजया नगर साम्राज्याच्या पुनर्निमाणाचा प्रारंभ केला 
१७४५: इंग्लंडमधील गिल्डफोर्ड येथे महिलांचा पहिला क्रिकेट सामना झाला.
१७८८: न्यूयॉर्क अमेरिकेचे ११ वे राज्य झाले.
१९०२: कोल्हापूर संस्थानात आरक्षणाची तरतूद.
१९५६ : जागतिक बँकेने आस्वान धरण बांधण्यासाठी अर्थसाहाय्य करण्यास नकार दिल्यावर ईजिप्तचे राष्ट्राध्यक्ष गमाल नासर याने सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केले.
१९६३: सिनकॉम या पहिल्या भूस्थिर उपग्रहाचे प्रक्षेपण
१९६५: मालदीवला (इंग्लंडपासून) स्वातंत्र्य मिळाले.
१९९८: १९९७ मधील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल विश्वनाथन आनंद याला प्रतिष्टेचा ’चेस ऑस्कर’ पुरस्कार प्रदान.
१९९९: भारताचा कारगिल युद्धात विजय झाला.
२००५ : मुंबई व परिसरात २४ तासात जवळजवळ १ मीटर (९९५ मिलीमीटर) पाउस. महापूरात शेकडो मृत्युमुखी.
२००५: अमेरिकन अंतराळ संस्था नासाने त्यांचे अंतरीक्ष यान डिस्कव्हरीचे प्रक्षेपण केले.
२००८: अमदावाद बाँबस्फोटात ५६ ठार २०० जखमी 

जन्मदिवस 
१८५६: नोबेल पारितोषिक विजेते आयरिश लेखक आणि लंडन स्कूल , ऑफ इकॉनॉमिक्सचे (LSE) सहसंस्थापक जॉर्ज बर्नार्ड शॉ 
१८६५: भारतीय कवी आणि
संगीतकार रजनीकांत सेन 
१८९३: ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं. कृष्णराव शंकर पंडित. राष्ट्रपती डॉ. राजेन्द्रप्रसाद यांनी त्यांचा ’राष्ट्रीय गायक’ म्हणून गौरव केला होता. 
१८९४: कवी, समाजसेवक वासुदेव गोविंद मायदेव, "शिशुगीते” हा संगीताचा प्रकार मराठी भषेत रूळविणारे महान महाराष्ट्रीयन मराठी बालगीत कवी.
१८९४: इंग्लिश लेखक अल्डस हक्सले
१९०४: फ्लाइट सिम्युलेटर चे शोधक एडविन अल्बर्ट लिंक.
१९८६: मुग्धा गोडसे, अभिनेत्री 

मृत्यूदिन
१३८०: जपानी सम्राट कोम्यो.
१८९१ : राजेन्द्रलाल तथा राजा मित्रा – बंगालमधील प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष (१८८५), भारतीय चित्रकला, शिल्पकला, राजकीय आणि सामाजिक विषयांवरील भाष्यकार 
१९६७: भारतातील प्रसिद्ध इतिहास, संस्कृत, कला आणि साहित्यांचे अभ्यासक व दिल्ली येथील राष्ट्रीय पुरातत्व संग्रहालयाचे सह-संस्थापक वासुदेव शरण अग्रवाल 
२००९ : भास्कर चंदावरकर, मराठी संगीतकार.

*।। दास-वाणी ।।* 

विषय अवघा त्यागावा । 
तरीच परमार्थ करावा । 
ऐसे पाहातां गोवा । 
दिसतों किं  ।। 

वैराग्ये करावा त्याग । 
तरीच परमार्थयोग । 
प्रपंचत्यागें सर्व सांग । 
परमार्थ घडे  ।। 

।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : १२/०७/०७-०९ 

देह धारण केलेला असेपर्यंत शब्द स्पर्शादि सर्व विषयांचा शतप्रतिशत त्याग करणे कोणालाही शक्य नाही. विषयांचा उपभोग सोडला तरच परमार्थ किंवा मोक्ष सिद्ध होईल हे विधान घोटाळयात टाकणारे आहे.

देहधारणेपुरते विषय सेवन शास्त्रांना मान्यच आहे. देहाच्या आधारेच साधना होते. साधनेतूनच मोक्षप्राप्ती होते. त्यामुळे देह टिकवणे तर आवश्यकच आहे.
फक्त विषयांच्या आसक्तीतून उपभोगलालसा वाढते. देहाचे लांगुलचालन वाढते. देहबोधावरच अडकलेला साधक मग आत्मबोधापर्यंत कधी पोहोचू शकत नाही.
म्हणूनच पारमार्थिक प्रगतीसाठी  क्रमाक्रमाने वैराग्यपूर्वक विषयत्याग सांगितला आहे.

विषयत्यागनिरूपण समास.

 🙏 💐💐💐💐💐 🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या