Ticker

6/recent/ticker-posts

हिमायतनगर तालुक्यातील पावन मारी गावाला स्वतंत्र काळापासून पक्का रस्ताच नाही रस्ते अभावी नागरिकांची हाल....

 लिंगोजी कदम :- जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड
 मो.9689821132 

हिमायतनगर -: तालुक्यात मागील दोन ते तीन दिवसापासून सतत होत असलेल्या अतिवृष्टीमुळे अनेक गावांना पुराच्या पाण्याने विणले तर अनेक गावाचे रस्ते पाण्याने खरडून गेले आहेत. त्यातच तालुक्यातील मौजे पावनमारी येथील एका 65 वर्षीय राधाबाई जाधव या वृद्ध महिलेची अचानक छाती दुखत असल्यामुळे तिला तात्काळ डॉक्टरची गरज असल्यामुळे गावातील सुजाण नागरिकांनी चक्क त्या महिलेला खांद्यावर घेऊन दोन ते तीन किलोमीटर पायपीट करून नंतर आपल्या मोटरसायकल वाहनांनी दहा किमी प्रवास करून उपचारासाठी शहरातील दवाखान्यात दाखल केले असे विदारक चित्र दिनांक 28 जुलै रोजी पाहायला मिळाले त्यामुळे उपस्थित गावकऱ्यांनी लोकप्रतिनिधीच्या बेजबाबदारपणा मुळेच पावणमारी गावाला स्वतंत्र काळापासून आध्याप पक्का रस्ता मिळाला नसल्याचा संतप्त व्यक्त केला आहे. याबाबत सविस्तर वृत्त अशी आहे की हिमायतनगर हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात वर्दळ असते सध्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याने अनेक गावाचा शहराशी संपर्क तुटत आहे तर काही ठिकाणचे रस्ते सुद्धा पावसाच्या पाण्याने खरडून गेल्याने नागरिकांना हिमायतनगर शहरास येण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशीच एक विदारक चित्र तालुक्यातील मौजे पावनमारी ते खडकी येथे दिनांक 28 जुलै रोजी पाहायला मिळाले पावन मारी या गावाला स्वतंत्र काळापासून अद्याप पक्का रस्ता नसल्यामुळे येथील नागरिकांना पावसाच्या दिवसात चिखल तुम्ही दोन ते तिन किलोमीटरचा पायी प्रवास करत नंतर खडकी मार्गे शहराच्या ठिकाणी हॉस्पिटल साठी यावे लागते अनेक वेळेस तर गावातील महिलांना बाळाच्या प्रसूतीसाठी शहराच्या ठिकाणी रात्री बे रात्री घेऊन जाण्याची वेळ आली तेव्हा गावातील नागरिकांच्या मदतीने चक्क पाळणा करून त्यांना उपचारासाठी घेऊन जावे लागत आहे अशी वारंवार तक्रार लोकप्रतिनिधीकडे करून सुद्धा या भागातील आमदार खासदार जि प सदस्य या लोकप्रतिनिधींनी या गावाला पक्का रास्ता दिला नाही त्यामुळे आज रोजी पावसामध्ये एका 65 वर्षीय राधाबाई जाधव या वृद्ध महिलेला चक्क खांद्यावर बसून दोन ते तीन किलोमीटर पायपीट करत नंतर आपल्या मोटरसायकलने खडकी मार्गे हिमायतनगर शहरात उपचारासाठी घेऊन जाण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पावनमारी येथील नागरिकांनी मतदार संघातील लोकप्रतिनिधीच्या विरोधात जाग येईल का असा प्रश्न समस्त पाहुनमारी वाशीयांना यांना पडलेला आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या