शिवराम काकांनी
अगदी सत्य परिस्थिती सांगितली आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील, तालुक्यातील, गावागावातील, जवानांना प्रत्येक गल्लीबोळात धर्माची दुकान लावून नोकरी विषयी न बोलता आपला धर्म यावर जास्त भर दिली जाते. याचाच अर्थ आपल्याला डेली हॅमरिंग करून त्या दिशेमध्ये आपल्याला वाढविण्यात अंधभक्त खरोखर पूर्ण तयारीने उतरलेले आहेत. त्यामुळे मायबाप जनतेने खरोखर अशा धर्माच्या आड लपलेले पाखंडी चोर यांच्यापासून वेळीच आपल्या, मुलं, बाळ, नातवंडांना, सावरून खऱ्या विषयाची ओळख देणे गरजेचे आहे, अन्यथा वेळ गेल्यावर आपलं घर मागे पडतं, आपली गल्ली मागे पडते, आपला तालुका मागे पडतो, आपला जिल्हा मागे पडतो, आपला राज्य मागे पडतो, तेव्हा आपण सर्व विसरून बसलेलो असतो म्हणून वेळ आली तेव्हाच अशा नागोबांचे मनावरती आपला हातोडा मारला पाहिजे .मतदान रुपी चावा घेतला पाहिजे.अन्यथा आपल्याला हे लोक दिशाहीन करतील.याची प्रत्येक नागरिकाची जबाबदारी घेणे बंधनकारक आहे.नाहीतर आपल्याला धर्माच्या आड लपून नसतानाबूत करतील.
आणि सांगतील आपला धर्म धोक्यात आहे अशा पाखडण्यांना वेळीच आळा घालण्यासाठी सर्व तरुणांनी एकजुटीने आपापल्या परीने गावोगावातून, तालुक्यातून, जिल्ह्यातून, असे धर्माच्या आड लपलेले लोकांना, धडा शिकवून येणारी पिढी उत्तम प्रकारे घडविण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे आता नाही तर कधीच नाही ही एक वोळ लक्षात ठेवा
संतोष पाटील...
आम आदमी पार्टी अध्यक्ष तालुका अमळनेर जिल्हा जळगाव...


0 टिप्पण्या