Ticker

6/recent/ticker-posts

आजी माजी नगरसेवच्या आणि नगर प्रशासनाच्या हलगर्जी पणा मुळे प्रगती नगर वासियांची दुरवेवास्ता.

प्रवीण शेंडे जिल्हा प्रतिनिधी गोंदिया ग्रामीण
मो.9834486558

 गोंदिया -: प्रगती नगरवासी तिरोडा, कडून
     काल रात्री पासून पावसाला सुरुवात झाली आहे. श्री सुरेश बनसोड, शेंडेजी, बिसेन गुरुजी, यांच्या घरासमोर खोलगट भाग असल्यामुळे दोन फुटपासून ते मेश्राम सरांच्या घरापर्यंत पृष्ठ भागिय पाणी रोड वरून वाहत आहे.खोलगट भागात तर नेहमीच चिखल युक्त पाणी जमा असतो. अश्या वेळी स्थानिक रहिवाश्यांनी घराबाहेर कसे पडावे,त्यामुळे रहिवाशीयांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे हा मुख्य प्रस्न आहे. याचे प्रत्यक्ष अनुभव अधिकारी, पदाधिकारी, व कार्यकर्त्यांनी घ्यावा.
   रोड वरून पाणी वाहण्याचे मुख्य कारण म्हणजे, यावर्षी संत रविदास वार्डतील नाली प्रगती नगर कडे वळविण्यात आली आहे,अशी चर्चा आहे.ती नाली पूर्वीच्याच मुख्य वहन नाली ला जोडण्यात यावी.
  2, पाणी जमा होत असलेल्या खोलगट भागात दोन फुटाचा भरण लेवल नुसार भरण भरावा.
3, तिसरा महत्त्वाचा भाग म्हणजे, कटरे सायकल स्टोर जवळ नाली मध्ये मालमा व गाळ जमा झाले आहे.
  तिथून ते खोलगट भाग पर्यंत गाळ काढणे आवश्यक आहे.
4, कर्मचारी नालीतील गाळ पूर्णपणे बाहेर काढत नाहीत. हीच मुख्य समस्या आहे.
   प्रगती नगर वासियांची विनंती आहे की,भरण लेवल नुसार पक्का रस्ता तयार झाला की, नेहमी करीता औषध शिवाय खोकला , ताप बरा होईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या