मिलिंद गायकवाड उपसंपादक महा, चित्रा न्यूज मो 9860179256
पुणे :- दिनांक 6 ऑगस्ट 2023 रोजी गुलटेकडी भैय्यासाहेब आंबेडकर चौक पुणे येथे साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने पँथर संघटनेचे संस्थापक /अध्यक्ष संजय नडगेरी यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे उदघाटन मा.जालिंदर वाघमारे (महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष :पँथर संघटना ) मा. अर्जुन शिंगे (कार्याध्यक्ष : पश्चिम महाराष्ट्र, दलित पँथर ) मा. अमोल शिंदे (उपाध्यक्ष : पुणे शहर, रिपाई ) मा. मिलिंद गायकवाड (अध्यक्ष: उस्मानाबाद जिल्हा, दलित पँथर) मा. समिना शेख ( सचिव : पुणे जिल्हा, दलित पँथर) या मान्यवरच्या हस्ते झाले.
सदर कार्यक्रमात गायक संतोष लांडगे यांनी प्रबोधनात्मक गीते सादर केली तसेच मा. डॉ वैष्णवी किराड (राष्ट्रीय सचिव :राष्ट्रीय युवक काँग्रेस ) मा. अनुराधा अवघडे (कार्याध्यक्ष : पुणे जिल्हा, दलित पँथर) व मा. सुरेखा खंडागळे (अध्यक्ष : पुणे शहर महिला आघाडी, मातंग एकता आंदोलन )यांच्या हस्ते पवन वाघमारे व प्रेरणा क्षीरसागर या गुणवंत विद्याथ्याना फकिरा हे पुस्तक देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे स्वागतध्यक्ष मा. बाबा रतनगिरी (अध्यक्ष : पुणे शहर, पँथर संघटना ) तर संयोजक अविनाश लांडगे (अध्यक्ष : पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा, पँथर संघटना ) हे होते तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सत्यम आगम, प्रेम काळे, गणेश भिसे यांनी परिश्रम घेतले.


0 टिप्पण्या