Ticker

6/recent/ticker-posts

कुजलेल्या स्थितीत अज्ञात इसमाचा आढळला मृतदेह

बामणी ग्रामवासीयांनी यासंदर्भात उपपोलीस ठाण्यात दिली तक्रार

भवन लिल्हारे कार्य. संपादक ( चित्रा न्युज महाराष्ट्र राज्य ) मो.नं.9373472847

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुक्यातील पोचमपल्लीजवळ प्राणहिता नदीकाठावरील शेतात ५ ऑगस्ट २०२३ रोजी कुजलेल्या स्थितीत एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. यासंदर्भात बामणी उपपोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. पोचमपल्ली येथील मलय्या दुर्गम यांचे शेतात कपाशीची लागवड केली आहे. सदर कपाशीत एका इसमाचे प्रेत असून त्याची दुर्गंधी सुटल्याची माहिती गावात पसरली.
त्यावरून गावातील लोकांनी जाऊन पाहिले असता जवळपास ४० ते ४५ वयाच्या अनोळखी इसमाचे प्रेत कुजलेल्या स्थितीत आढळून आले. याबाबत बामणी उपपोलिस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली. परंतु त्या व्यक्तीची अद्यापही ओळख मात्र पटली नाही. सदर इसमाची उंची अंदाजे ५ फुट ७ इंच आहे. त्याच्या अंगात कत्त्या रंगाची टी-शर्ट आणि काळ्या रंगाचा फुल पॅन्ट आहे, असे बामणी उप पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक मदन मस्के, चौकशी अधिकारी पीएसआय संभाजी मुंडे यांनी कळविले. पुढील तपास बामणी उपपोलीस स्टेशनचे प्रभारी करीत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या