रुपाली मेश्राम कार्य.संपादक चित्रा न्युज मो.9552073515
अकोला: पातूर तालुक्यातील नऊ गावांतील विविध कारणांमुळे रिक्त असलेल्या रास्त भाव दुकानांसाठी इच्छूकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
पातूर तालुक्यातील जांभरूण, पळसखेड, बाभळी, दादुळगाव, पार्डी, कोठारी खुर्द, निमखेड, गोळेगाव, हिंगणा (वाडे) या गावांमध्ये रास्त भाव दुकाने मंजू करण्यात येणार आहेत. तसा जाहीरनामा या गावांत प्रसिद्ध करण्याचे आदेश तहसीलदारांनी तलाठ्यांना दिले आहेत.
अर्जाचा नमुना तहसील कार्यालयात उपलब्ध असून, 100 रू. चलन भरून तो मिळू शकेल. तहसील कार्यालयात दि. 1 सप्टेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज सादर करता येईल.


0 टिप्पण्या