Ticker

6/recent/ticker-posts

जि. प. प्रा. शा. ब्रह्मगव्हाण केंद्र लोहगाव येथे शाळेच्या परिसरामध्ये ग्रामपंचायत मार्फत पेवर ब्लॉकचे भव्य शुभारंभ

पैठण तालुका लोहगाव सर्कल,
 प्रतिनिधी विजय केदारे.
मो.९९२३१६७४९७

 पैठण -: तालुक्यातील ब्रह्मगव्हण येथील जि.प.प्रा.शाळेचा परिसर नीटनेटका व सुंदर दिसण्यासाठी तसेच शाळेचे शोभिकरण    करण्यासाठी शाळेच्या परिसरामध्ये १७ ब्रास पेव्हर ब्लॉक बसवण्याचा निर्धार ग्रामपंचायत मार्फत करण्यात आला. त्या अनुषंगाने दि.१२/८/२०२३ शनिवार रोजी प्रत्यक्ष स्वरूपी कामाला सुरुवात करण्यात आली.. त्याप्रसंगी गावचे सरपंच ज्ञानेश्वर  शिंदे, उपसरपंच काकासाहेब  कानुले, माजी सरपंच रावसाहेब नाना तेजिनकर, भास्करभाऊ तेजिनकर, ग्राम पंचायत सदस्य विठ्ठलभाऊ पवार, 
शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर तेजिनकर, अरुणभाऊ केदारे, सोमिनाथ बोरुडे, यांच्यासह समस्त गावकरी मंडळी व 
 प्रा.शा नदीकाठवस्ती शाळेचे सहशिक्षक श्री रवी केदारे सर, ब्रह्मगव्हाण शाळेचे मुख्याध्यापक श्री मिसाळ कैलास, सहशिक्षक श्री गजानन डुकरे सर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या