चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर संपादक महा चित्रा न्यूज मो.८८८८११७९७५
जामखेड :- मेरी माटी मेरा देश अर्थात माझी माती माझा देश हा कार्यक्रम १२ ऑगस्ट २० २३ रोजी सकाळी ९ वाजता जामखेड तालुक्यातील सर्व शाळा मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब धनवे यांनी दिली .
माती असलेला कलश व मशालसह प्रभात फेरी काढण्यात आली , यावेळी विद्यार्थी यांनी विविध घोषणा दिल्या .शिला फलक उभारण्यात आला ,पंचप्राण ची शपथ घेण्यात आली , वीरांना वंदन करण्यात आले , वसूधा नमन करण्यात आले . शाळेतील विद्यार्थी वेगवेगळ्या सुंदर गणवेशामध्ये फेरीत सहभागी झाले .


0 टिप्पण्या