रुपाली मेश्राम कार्य.संपादक चित्रा न्युज मो.9552073515
कोल्हापूर - आदिवासी, भटक्या जाती, विमुक्त जमाती सह विविध जात समूहात विखुरलेल्या ओबीसी बांधवाना सत्तेच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून बाळासाहेब आंबेडकर हे करतात त्यांचे हात बळकट करूया व वंचित बहुजन आघाडीची विचारधारा घराघरात पोहचवू या असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष मा भिमराव गोंधळी यांनी बोलताना व्यक्त केले.
आरे ता. करवीर येथील वंचित बहुजन आघाडीच्या नूतन शाखेच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होते. या वेळी शाखेच्या डिजिटल फलकाचे अनावरण मा तानाजी काळे ( जिल्हा संघटक ) व मा प्रताप तराळ ( जिल्हा सचिव ) यांच्या हस्ते करण्यात आले.सूत्र संचालन निरंजन ढाले, यांनी केले तर आभार सौ. मुक्ताताई भास्कर यांनी मानले.
या वेळी प्रमुख उपस्थितीत मध्ये आनंद सोरटे ( माजी सरपंच ) विनायक लोहार ( पोलीस पाटील ), संतोष पोर्लेकर, हिंदुराव सोरटे ( शाखा अध्यक्ष ), कबीर सोरटे ( शाखा उपाध्यक्ष ) शिवाजी कांबळे ( सचिव ) तानाजी कुबडे ( खजानिस ), अर्जुन कांबळे शिवाजी कांबळे,अमर वरुटे, सुदाम कांबळे दिलीप कांबळे दाजी ढाले, भिकाजी कुबडे, भिवा कुबडे, विजय कुबडे, प्रशांत कांबळे, तानाजी कांबळे, ज्ञानदेव कुबडे, दिगंबर कांबळे, साऊ ढाले, शक्ती सोरटे, धर्मा ढाले, रत्नाबाई ढाले, भरत ढाले, सारंग ढाले, दशरथ ढाले आदी शाखेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


0 टिप्पण्या