जळगाव शहराचे महापौर यांनी निवडणूक तोंडावर आली असता करपट्टी माफीची खिरापत देऊ केली आहे.तर मग,हेच नियोजन कर लागू करतांना का नाही केले? तेंव्हा सुद्धा नवरा बायको नगरसेवक होतेच की.तर आत्ताच का इतके उदार झाले ?पण हे सुद्धा आईजीच्या जिवावर बाईजी उदार !
कर तर सर्वच नागरिक भरतात.उलट ज्यांचे घर मोठे आहे ,ज्यांचे उत्पन्न मोठे आहे ते जास्त भरतात.नियमित भरतात.नाही भरले तर फडणवीस आणि मोदी डोळे वटारतात.लाओ हुंडी ,नही तो लगाऊ क्या इडी? बिचारे भरतात.गरीब नसले म्हणून काय झाले?चोर तर नाहीत? ऐतखाऊ तर नाहीत?मत तर विकत नाहीत?तर मग,असा काय गुन्हा?कर भरा चारगुणा?
जळगाव शहरातील पांचशे फुटाचे आत घर असेल तर घरपट्टी माफ.असे विधान महापौर जयश्री महाजन यांनी करून करदात्यांवर अन्याय करीत आहात.असे आता होऊ देणार नाही.जर करमाफी द्यायची असेल तर ती सहसकट सर्वच नागरिकांना दिली पाहिजे.१८ कोटी आणखी कमी होतील.काय फरक पडतो ? पन्नास कोटी तर नगरसेवक युं युं हजम करून जातात.ते सुद्धा प्रामाणिक करदात्यांच्या खिशातूनच.आता जर सर्वच नगरसेवकांचे खिसे झटकले तर घरपट्टी न घेता नगरपालिका एक वर्ष चालू शकते.गरीब होतास तो,अमिर झालास तो!पहा,एकेकाची काय काय प्रॉपर्टी झाली?घर बदलले.कार बदलली.कपडे बदलले.केसांचा डाय बदलला.कंगवा बदलला.बॅंक बदलली.पार्टी बदलली.आता देश ही बदलतील.
आम्ही जळगाव चे आम नागरिकांची मागणी आहे कि, पांचशे फुटांच्या आत घर असलेल्या लोकांना घरपट्टी माफ करा.पण असे दुजाभाव नको.सर्वच नागरिकांची घरपट्टी पांचशे फुटाची कमी करा.हजारात असो कि लाखात असो.
आताच महाराष्ट्र सरकारने जाहीर केले कि, सरकारी आरोग्य सुविधा घेण्यासाठी कोणतीही अट नाही.कोणतेही कार्ड नाही.कारण जगणे सर्वांचेच महत्वाचे आहे.म्हणून इलाज सर्वांना आवश्यक आहे.कशाला हवी अट? हे कागद आणा,ते कागद आणा.फालतू हेराफेरी नको.हे आवडले जनतेला.तसेच !
जळगाव महापालिकेने सर्वच नागरिकांना सारखीच सवलत दिली पाहिजे.ते आवडेल आम्हाला.
( आज बुधवारी संध्याकाळी सात ते नऊ वाजता जळगाव शहरातील मोराको हॉटेल मधे आम्ही या विषयावर करदाता नागरिकांचे मत जाणून घेत आहोत. कर दिया जाय या छोड दिया जाय?बोल तेरे साथ क्या सलुक किया जाय?)
... शिवराम पाटील
९२७०९६३१२२
महाराष्ट्र जागृत जनमंच
जळगाव


0 टिप्पण्या