Ticker

6/recent/ticker-posts

माझी माती माझा देश" उपक्रम लोकचळवळ म्हणून राबवा

"
• गटविकास अधिकारी अरुण गिऱ्हेपुंजे यांचे आवाहन

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा
मो.9545914324


भंडारा :- केंद्र शासनाच्या निर्देशानुसार मागील वर्षीच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव कार्यक्रमाअंतर्गत महत्वाकांक्षी समारोपीय उपक्रम "माझी माती माझा देश" या अभियानाला लोकचळवळ म्हणून राबवावे असे आवाहन लाखनी पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी अरुण गिऱ्हेपुंजे यांनी पंचायत समिती सभागृहात आयोजित ३ ऑगस्टच्या बैठकीमध्ये विविध विभागातील अधिकारी व ग्रामसेवकासोबत या उपक्रमाबाबद चर्चा करतांना मार्गदर्शन केले. 
               ज्या शुरवीरांनी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले अशा वीरांप्रती कृतज्ञता दाखविण्यासाठी हा उपक्रम साजरा करावे. यंदा या अमृत महोत्सवाची सांगता करण्यासाठी सरकारतर्फे "माझी माती माझा देश" अभियान राबविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर ९ ते १५ ऑगस्ट दरम्यान विविध उपक्रमांसह लाखनी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायतीत तसेच ग्रामीण भागात सर्व शासकीय कार्यालयामार्फत वृक्षारोपण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीत एकूण ७५ झाडे लावून अमृतमहोत्सवाची सांगता करण्याचे निर्देश दिलेले आहेत. 
               या उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत स्तरावर शिलालेख लावणे, पंचप्राण प्रतिज्ञा घेणे, सेल्फी काढणे, वसुधा वंदन करणे, वीरांना वंदन करणे, ध्वजारोहण व राष्ट्रगान गायन करणे इत्यादी उपक्रमांचा समावेश आहे. वसुधा वंदन या उपक्रमाकरिता प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर ७५ देशी वृक्षांची लागवड करण्यात येणार असल्याने या वृक्षलागवडीमुळे भविष्यात “अमृत वाटिका” तयार होण्याचे उद्दिष्ट समोर ठेवलेले आहे. म्हणून सर्व नागरिकांनी "माझी माती माझा देश" हा अभियान न राहता लोकचळवळ बनली पाहिजे असे गटविकास अधिकारी अरुण गिऱ्हेपुंजे यांनी आव्हान केले आहे.


ह्या ठिकाणी होणार वसुधा वंदनाचा कार्यक्रम

 ग्राम पंचायत स्तरावर असलेल्या अमृत सरोवराचे ठिकाणी किंवा अमृत सरोवराचे परिसरात वसुधा वंदनाचा कार्यक्रम करण्यात येईल. ग्राम पंचायत स्तरावर अमृत सरोवर उपलब्ध नसल्यास इतर पाणी साठ्याचे ठिकाणी, ग्रामपंचायत किंवा शाळा परिसर मध्ये वृक्षलागवड करण्यात यावी. वसुधा वंदनाचे ठिकाणी मातृभूमीची स्वातंत्रता आणि तिचा गौरव यांच्या रक्षणाकरिता वीरांनी दिलेल्या बलिदानाची माहिती जनतेस मिळावी याकरिता शीला लेख तयार करण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या