Ticker

6/recent/ticker-posts

तापमानात वाढ; नागरिकांचे हाल.!

श्रीकांत बारहाते चित्रा न्युज 

हिंगोली :-वसमत तालुक्यात तापमानात प्रचंड वाढ होत असल्याने नागरिकांसाठी मे महिना कसोटीचा ठरत आहे. तापमानाचा पारा 42 अंशाच्या वर गेल्याने नागरिक घामाच्या धारांनी हैरान झाले आहेत.
तापमानाचा पारा वाढतच चालल्याने नागरिकांना उष्माच्या प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
मे महिन्याच्या सुरुवाती पासूनच तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली तापमानाचा पारा सुसाट वेगाने सुरू असून यंदा हे तापमान रेकॉर्ड नोंदवणार का अशी चर्चा नागरिकांतून सुरू झाली आहे. सकाळी सात वाजेपासून उन्हाच्या तीव्रतेने नागरिकांना हैराण केले आहे. रात्री सात वाजेपर्यंत उन्हाच्या झळा जाणवत आहेत. गेल्या आठवड्यातील ढगाळ वातावरणा नंतर तीन दिवसापासून विजेचे उपकरणे गरम हवा फेकू लागले आहेत. दुपारी घर कार्यालय अस्थापना मध्ये बसणे मुश्किल झाली आहे. नागरिक उन्हापासून बचावासाठी विविध उपयोजना करत आहेत.
मान्सून सुरू होईपर्यंत तापमानाचा पारा कायम राहण्याची शक्यता असून नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय तज्ञांनी केले आहे. सूर्यनारायणाचा प्रकोप जाणवत आहे. अति उष्णतेच्या लाटा व वाढत्या तापमानामुळे लहान मुले वृद्ध,गर्भवती अपघातग्रस्त, रुग्ण त्रस्त झाले आहेत.
उन्हाने ग्रस्त झालेले नागरिक गच्ची बंगल्याच्या टेरेसवर झोपण्याला पसंती देत आहेत. सर्वसामान्य नागरिक दाट गडद गर्द हिरव्या डेरेदार वृक्षाखाली आश्रय घेऊन उष्णतेपासून बचाव करीत याच चिंतेने नागरिकांना ग्रासलं आहे.
तापमानाचा पारा सलग कायम असल्याने शहरातील व ग्रामीण भागातील जनजीवन व विविध व्यवसायांनवरही त्याचा परिणाम दिसून येत आहे, तापमानात वाढ होत असतानाच वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या