Ticker

6/recent/ticker-posts

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा लक्षवेधी कार्यकर्ता पुरस्कार 2024 विष्णुदास लोणारे यांना प्राप्त



संजीव भांबोरे भंडारा 
भंडारा:- शहिद डॉ. नरेंद्र दाभोलकर प्रणित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती च्या विस्तारित राज्य कार्यकारणी इस्लामपूर जिल्हा सांगली येथे आयोजित केली होती. या  वेळी भंडारा जिल्ह्यातील अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ता विष्णुदास लोणारे यांना लक्षवेधी कार्यकर्ता पुरस्कार 2024 डॉ. भारत पाटणकर ज्येष्ठ विचारवंत श्रमिक मुक्ती दलाचे नेते यांच्या हस्ते आज दिनांक 1जून 2024 रोजी यांना मानचिन्ह,प्रमाणपत्र आणि पुस्तक देऊन, सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे, संजय बनसोडे, अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका चे संस्थापक मंडळ प्रा. नितीन शिंदे, डॉ. गोराणे, उत्तम जोगदंड, तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आले यावेळी भंडारा येथून दशरत शहारे उपस्थित होते .या पुरस्काराबद्दल प्रा.युवराज खोब्रागडे, प्रा. नरेश आंबीलकर, प्रकाश नाकतोडे, नितेश बोरकर, माया बारापात्रे, अजय वासनिक, अश्विनी भिवगडे, त्रिवेनि वासनिक ,कविता लोणारे, पुरुषोत्तम कांबळे, पुरुषोत्तम गायधने ,संजय कटारे ,चंद्रशेखर भिवगडे, चंद्रशेखर खोब्रागडे, डॉ. विश्वजीत थुलकर ,डॉ. नरहरी नागलवाडे यांनी अभिनंदन केले .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या