करांडला येथील घटना
पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा - जुन्या घराची भिंत कोसळल्याने मलब्याखाली दबून युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवार(ता ७ जुलै) रोजी दुपारी १ वाजता दरम्यान करांडला येथे घडली. मृतकाचे नाव योगेश खुशाल देशमुख (३५) राहणार करांडला , तालुका लाखांदूर असे आहे . लाखांदूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पोलीस निरीक्षक सचिन पवार यांचे मार्गदर्शनात तपास सुरू आहे.
योगेश देशमुख शेतकरी असून सकाळचे सुमारास शेतावरील काम आटोपून घरी परतला . दुपारचे सुमारास आपले जुण्याघरालगत काम करीत असताना अचानक जुन्या घराची मातीची भिंत कोसळली . भिंतीचे मलब्यात योगेश दबला ही बाब कुटुंबीयांसह शेजाऱ्यांच्या निदर्शनास येताच आरडाओरड केल्याने मदतीसाठी आजूबाजूचे गावकरी धावून आले व त्याला मलब्याबाहेर काढून उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे पाठविण्यात आले. कर्तव्यावरील वैद्यकीय अधिकाऱ्याने तपासून त्याला मृत घोषित केले तथा लाखांदूर पोलिसांना घटनेची माहिती दिली . घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी घटनास्थळ गाठून सोपास्कार पार पाडले तथा मृतदेह उत्तरीय परिक्षणासाठी पाठविला . शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांचे ताब्यात देण्यात आला. स्थानिक स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. लाखांदूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. मृतक योगेश याला पत्नी , एक चिमुकली व बराच आप्त परिवार आहे. मनमिळावू योगेशच्या अकाली निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे. लाखांदूर पोलीस तपास करीत आहेत.


0 टिप्पण्या