• डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरमची मागणी
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- दीक्षाभूमी ही देशासह जगातील बौद्ध समाजाची अस्मिता असून शासनाने दीक्षाभूमी लगत अंडरग्राउंड पार्किंग करिता खोदकाम केलेले आहे. या खोदकामामुळे दीक्षा भूमीच्या स्तूपाला धोका निर्माण होऊन बोधिवृक्षाचे मुळांना धोका होऊन बोधिवृक्ष कालांतराने कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. बौद्ध अनुयायी अथवा स्मारक समितीला विश्वासात न घेता शासनाने अंडरग्राउंड पार्किंग चे कामाकरिता खोदकाम सुरू केल्यामुळे बौद्ध अनुयायांच्या भावना अनावर होऊन दीक्षाभूमी परिसरात जमाव एकजूट होऊन जमावाने शासनाकडून होत असलेले काम बंद पाडले. दीक्षाभूमी बचाव आंदोलना दरम्यान पोलिस प्रशासनाने बजाजनगर पोलिस ठाण्यात आंबेडकरी अनुयायांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केलेले आहेत. दाखल गुन्हे मागे घेण्यात यावे अशी मागणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम जिल्हा शाखा भंडारा द्वारे करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा महासचिव कैलास गेडाम, प्रसिध्दी प्रमुख कालिदास खोब्रागडे, ओबीसी आघाडी अध्यक्ष सुरेश मेश्राम, उपाध्यक्ष अरविंद कठाने, साकोली तालुकाध्यक्ष किशोर तरजुले, लाखनी तालुकाध्यक्ष अरविंद रामटेके, युवक आघाडी अध्यक्ष सोनु राऊत, तालुका सचिव दादू बडोले, विद्यार्थी आघाडी चे साहिल खोब्रागडे, नितीन इलमकर, दिलीप बोरकर, भागवत मेश्राम, प्रमोद शिंगाडे, गिरिधारी बडोले, नित्यानंद मेश्राम, चिरंजीव बारसागडे प्रामुख्याने उपस्थित होते.


0 टिप्पण्या