सम्यक घुले यवतमाळ


यवतमाळ :-"घराघरातून प्रत्येकाने समता सैनिक दलात सहभागी झालं पाहिजे" 

दिनांक 25 ऑगस्ट 2024 रोजी रविवारला स्थानिक धम्मराजिका बुद्ध विहार येथे समता सैनिक दलाचे एक दिवसीय तालुकास्तरीय बौद्धिक शिबिर आयोजित करण्यात आले.

      मारेगाव शाखेचे तालुका संघटक मार्शल प्रकाश ताकसांडे सर यांच्या अध्यक्षतेखाली तर कास्ट्राईब कर्मचारी शिक्षक संघटनेचे तालुका अध्यक्ष धर्मराज सातपुडके यांच्या हस्ते प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन तर मनोज लांजेवार आणि गौरव चिकाटे सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्घाटन कार्यक्रम आटोपला.प्रास्ताविक गौतम तोताडे सर यांनी केले. दोन सत्रामध्ये चालणाऱ्या या बौद्धिक शिबिरामध्ये प्रथम सत्रात *वर्तमान आणि आंबेडकरी युवक* या विषयावर मार्शल आनंद नगराळे यांनी उपस्थित यांना मार्गदर्शन केले. त्यानंतर यवतमाळ जिल्ह्याच्या जिल्हा संघटिका( महिला विंग) मार्शल शितलताई चिकाटे यांनी *आंबेडकरी चळवळीतील स्त्रियांचा सहभाग* या विषयावर अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. द्वितीय सत्रामध्ये *बौद्ध संस्कृती जतन करण्यामध्ये आजच्या बौद्धांची भूमिका* या विषयावर जिल्हा संघटक समता सैनिक दल मार्शल अशोक खरतडे सर यांनी आपली भूमिका मांडली. आपल्या मुलांवर बौद्ध संस्कार करण्याकरिता आजच्या आईंनी जागरूक राहिले पाहिजे. माझे कुटुंब बौद्धमय झाले तरच बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे '*मी भारत बौद्धमय केल्याशिवाय राहणार नाही*'  या ध्येयाप्रत आपण नक्कीच जाणार, यात मात्र शंका नाही, परंतु आजच्या या काळामध्ये आपण बघतो तेव्हा बौद्ध संस्कृतीचे पालन करणे, बौद्ध संस्कार यापासून आजचा हा आंबेडकर समाज कोसो दूर आहे.बाबासाहेबांच्या दिलेल्या अनमोल अशा धम्माला आपण समजून घेतलं पाहिजे आणि सर्वांनी समता सैनिक दलात सामील होऊन आंबेडकरी चळवळ गतिमान करण्यामध्ये आपला सहभाग वाढवला पाहिजे.समता सैनिक दल यवतमाळ द्वारा आयोजित  जिल्हास्तरीय एकदिवसीय चिंतन शिबिर यवतमाळ येथे 8 सप्टेंबरला आयोजित केलेले असून या शिबिराला सर्व मार्शलनी यावे असे आवाहन त्यांनी आपल्या मार्गदर्शनातून केले.
द्वितीय सत्राचे शेवटचे मार्गदर्शन समता सैनिक दलाचे वरिष्ठ कार्यकर्ता मार्शल विलास नरांजे सर यांनी केले. *समता सैनिक दल काल आणि आज* या विषयावर त्यांनी समता सैनिक दल ही काळाची गरज आहे. बाबासाहेबांचे आंदोलन यशस्वी करण्यामध्ये समता सैनिक दलाने त्या काळामध्ये अतिशय मोलाची भूमिका बजावली.तेव्हा आजच्या ह्या काळामध्ये आंबेडकरी आंदोलन जर प्रामाणिकपणे आणि सक्षमतेने तेवढ्याच ताकतीने जर आपल्याला पुढे न्यायचे असेल तर समता सैनिक दलाचा प्रामाणिक सैनिक प्रत्येक घरातून तयार झाला पाहिजे. समता सैनिक हाच आंबेडकरी समाजामध्ये प्रेरणा जागृत करू शकतो . असे विचार त्यांनी व्यक्त केले.

आभार प्रदर्शन अनिकेत काटकर सर यांनी केले. सूत्रसंचालन मार्शल एडवोकेट देवानंद भगत यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी समता सैनिक दलाचे सर्व कार्यकर्ते तथा महिला विंग यांनी प्रयत्न केले. या शिबिरा करिता शहरातील समता सैनिक दलाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते...