Ticker

6/recent/ticker-posts

उल्हासनगरातील पँथर नाना पवार रिपाइंचे महाराष्ट्र प्रदेश सचिव -केंद्रीयराज्यमंत्री रामदास आठवले



चित्रा न्युज ब्युरो
मुंबई: - पँथर च्या काळापासुन आंबेडकरी चळवळीत स्वतःला झोकुन देणारे उल्हासनगरमधील जुने पँथर माजी नगरसेवक नाना पवार यांची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले)पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी निवड करण्यात आली आहे.त्यांना रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांच्या हस्ते नियुक्त पत्र नुकतेच प्रदान करण्यात 
आले आहे. 
रिपब्लिकन पक्षाचे (आठवले )
माजी जिल्हाध्यक्ष भगवान भालेराव यांच्यावर पक्षविरोधी कार्यवाही करण्याचा
ठपका ठेवून रामदास आठवले यांनी भालेराव यांना पक्षातुन काढून टाकले आहे.आठवले यांनी भालेराव यांच्या जागी शिवसेना शिंदे गटाचे शहर संघटक नाना बागुल यांची जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. ज्येष्ठ पँथर माजी नगरसेवक नाना पवार यांच्यावर महाराष्ट्र सचिव पदाची जबाबदारी सोपवली आहे. 
नाना पवार यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आठवले) पक्षाकडुन एकवेळेस नगरसेवक राहिले असुन त्यांच्या पत्नी पंचशीला पवार या तीन वेळेस नगरसेविका राहील्या आहेत.त्यांनी उपमहापौर पद ही सांभाळले आहे.या घडीला उल्हासनगर शहरात नाना पवार यांच्यासह सुरेश सावंत,बी.बी.मोरे,महादेव सोनावने,अरुण कांबळे,शांतारान निकम आदी जुने पँथर नेते रिपब्लिकन पक्षाचे संघटनात्मक बळ वाढवीत 
आहेत. 


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या