• पोहरा येथील परवानाधारक देशीदारू दुकानातील प्रकार
• राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कार्यप्रणाली प्रश्नचिन्ह
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :-लाखनी तालुक्यातील पोहरा येथे फुटकळ देशी द्रू दुकान असून परवाना क्रमांक सीएल ||| ४६ असून या देशीदारू दुकानात एमआरपी पेक्षा अधिक दराने दारुविक्री केली जाते. तसेच मुरमाडी/तूप परिसर आणि राष्ट्रीय महामार्गावरील ढाब्यावर अवैध दारू पुरवठा केला जातो आणि या परवाना प्राप्त देशीदारू दुकानात पिण्याचे पाण्यासाठी आरओ ची व्यवस्था नाही. ही बाब स्थानिक राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांसह विभागातही माहिती असून सुद्धा अर्थकारणामुळे या देशी दारू दुकानावर कारवाईचे सौजन्य दाखविले जात नसल्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याचे मार्गावर आहे. वरिष्ठ राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी या देशीदारू दुकानाची चौकशी करून परवाना निलंबित करणे आवश्यक झाले आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे कामकाज सुचारू पद्धतीने चालावे. या करिता भंडारा येथे अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांचे कार्यालय असून त्याचे अधिनस्त साकोली व भंडारा येथे निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क कार्यालय आहेत. साकोली कार्यालयाचे अधिनस्त लाखनी, साकोली, लाखांदूर व पवनी हे ४ तालुके असून लाखनी व पवनी हे एक बीट तर लाखांदूर व साकोली हे दुसरे बीट आहे. सदर बीटांची जबाबदारी दुय्यम निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांवर आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून राज्याला अधिक कर मिळत असला तरी या विभागाचे अधिनस्त असलेल्या परवानाधारक देशीदारू दुकानातून राज्य उत्पादन शुल्क विभागातील अधिकारी व परवानाधारक यांच्या संगनमताने अर्थकारण करून अनेक प्रकारच्या अनियमितता केल्या जात असल्याची माहिती असताना सुद्धा राज्य उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षकापासून शिपायापर्यंत मूग गिळून गप्प आहेत.
पोहरा येथे एन.जी. हटनागर व भागीदार एन.एस. हटनागर यांचे नावाने चिल्लर देशीदारू विक्री परवाना असून परवाना क्रमांक सीएल ||| ४६ असला तरी हे परवानाधारक देशी दारू दुकान परराज्यातील अण्णा नामक इसमाला मागील अनेक वर्षापासून भाड्याने दिले आहे. अण्णा व राज्य उत्पादन शुल्क विभागातील स्थानिक दुय्यम निरीक्षक याचे वरदहस्ताने हे देशीदारू दुकान शासनाने ठरवून दिलेल्या वेळेआधी सुरू होते तर उशिरा बंद केले जाते. एमआरपी पेक्षा अधिक दराने दारूविक्री तसेच मुरमाडी/तूप परिसरातील काही अवैध देशीदारू विक्रेत्यांसह राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील काही ढाबा संचालकांना अवैधरीतीने देशीदारू पुरवठा केला जातो. देशीदारू दुकानात पिण्याचे पाण्याकरिता आरओ ची सोय नसल्यामुळे दूषित पाण्यामुळे भविष्यात मद्यपींना आरोग्य विषयक समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या शिवाय अनेक अनियमितता असल्याची बाब स्थानिक दुय्यम निरीक्षकासह अधिक्षकांनाही माहिती आहे. पण याकडे हेतू पुरस्पर कानाडोळा करून महिन्यातून ठराविक दिवशी या देशी दारू दुकानास भेटी देऊन ठरल्यानुसार हप्ता वसुली केली जाते. असे गावकऱ्यांचे म्हणने आहे. त्यामुळे हे देशीदारू दुकान भाड्याने घेतलेल्या अण्णा नामक इसमाचे भाव वधारले असून कोणी विरोधात गेल्यास दमदाटी करून राज्य उत्पादन शुल्क विभाग आपल्या खिश्यात असल्याची बतावणी करतो. असे नाव न छापण्याचे अटीवर एका ग्राहकाने सांगितले. पोहरा येथील परवानाधारक देशी दुकानाची वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशी करून ह्या दुकानाचा परवाना निलंबित करणे गरजेचे झाले आहे.
0 टिप्पण्या