Ticker

6/recent/ticker-posts

अखेर...संगणक परिचालकांच्या खात्यात मानधनाची रक्कम जमा !

• दखल चित्रा न्युज च्या वृत्ताची 

कालिदास खोब्रागडे, चित्रा न्युज
भंडारा :- तुटपुंज्या मानधनावर डिजिटल महाराष्ट्र घडविण्याचे काम करणाऱ्या संगणक परिचालकास मागील जुलै ते ऑक्टोबर २०२४ या कालावधीचे मानधन मिळाले नसल्यामुळे त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागून कुटुंबात गृहकलह निर्माण झाले होते. या बाबद चित्रा न्युज चे २९ ऑक्टोबर चे अंकात "संगणक परिचालकांची दिवाळी अंधारात" ह्या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित होताच 'रेलटेल' कंपनीचे अधिकाऱ्यांची थाडकन झोप उघडून संगणक परिचालकांचे बँक खात्यात ३ महिन्याचे मानधन जमा करण्यात आल्याने संगणक परिचालकांची दिवाळी साजरी होणार आहे.
                  महाराष्ट्र शासनाच्या वित्त आयोग प्रकल्पा अंतर्गत मागील १३ वर्षापासून ग्राम पातळीवरील स्थानिक स्वराज्य संस्था स्तरावर संगणक परिचालक प्रामाणिकपणे आपली सेवा देत असून जन्म-मृत्यू-विवाह, नमुना ८, क्रियासॉफ्ट, १ ते ३३ नमुने, विविध शासकीय योजना व इतर कार्यालयीन सेवा, गावकऱ्यांना विविध प्रकारचे आवश्यक ते प्रमाणपत्र एकाच छताखाली संगणक परिचालकाचे माध्यमातून देण्यात येतात. हा प्रकल्प संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र(संग्राम) म्हणून कार्यरत होता. त्यानंतर महाराष्ट्र शासनाने सी.एस.सी. या खासगी कंपनीमार्फत "आपले सरकार सेवा केंद्र" चालविले जात होते. आर्थिक वर्ष २०२४-२५ पासून पुन्हा कंपनी बदलविण्यात आली.
                  ग्रामपंचायत स्तरावर १५व्या वित्त आयोगामार्फत १२ हजार रुपये प्रति महिना या प्रमाणे वार्षिक एकत्रित मानधन जिल्हा परिषदेला आरटीजीएस व्दारे ग्रामपंचायतीकडून अदा केले जाते. मात्र संगणक परीचालकास मानधन वेळेवर आणि दरमहा कधीच मिळत नाही. त्यामुळे संगणक परीचालकाला आर्थिक विवंचनेत जीवन यापन करावे लागते. या बाबीस कंटाळून काही संगणक परिचालकाकडून आत्महत्याही केल्या असल्याचे समजते. 
                 संगणक परिचालक तुटपुंज्या मानधनावर आपली सेवा देत असला तरी त्याला वेळेवर मानधन कधीच मिळाले नाही. या विरोधात संगणक परिचालकांनी किती तरी वेळा कामबंद आंदोलन केले होते. आर्थिक वर्ष २०२४-२५ पासून रेलटेल कंपनीला कंत्राट देण्यात आले असून ह्या नव्या कंपनीनेही जुलै ते ऑक्टोबर २०२४ चे मानधन अदा केले नाही. त्यामुळे संगणक परिचालकांची दिवाळी अंधारात जाणार आहे. कंपनी बदलल्यामुळे जुलै ते ऑक्टोबर २०२४ चे मानधन मिळेल का ? असा संगणक परीचालकांत संभ्रम निर्माण झाला आहे. संगणक परिचालकाच्या कुटुंबाचा विचार करून दिवाळी पूर्वी तसेच दर महिन्याला मानधन देण्यात यावे. तसेच थकीत असलेले ४ महिन्याचे मानधन तात्काळ अदा करावे. असे चित्रा न्युज मध्ये वृत्त प्रकाशित होताच आर्थिक वर्ष २०२४-२५ पासून कंत्राट मिळालेल्या रेलटेल कंपनीच्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले व त्यांनी संगणक परीचालकांच्या बँक खात्यात जुलै ते सप्टेंबर २०२४ या कालावधीचे मानधन जमा केल्याने संगणक परिचालकांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्यामुळे चित्रा न्युज चे आभार मानले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या