Ticker

6/recent/ticker-posts

बाळासाहेबांनी संधी दिल्यास विधानसभा निवडणूक लढणार

• सामाजिक कार्यकर्ता अरुण गोंडाणे यांची माहिती 

कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- जिल्ह्यातील अनेक सामाजिक व सांस्कृतिक संघटनांशी जवळचा संबंध असलेले तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांत सरपंच, पंचायत समिती सदस्य ही पदे भूषविणारे या शिवाय आंबेडकरी चळवळीला वाहून घेतलेले व्यक्तिमत्त्व म्हणून ख्यातीप्राप्त असलेले अरुण जाधोजी गोंडाणे वाकेश्वर(पहेला) यांना राजकारणाचाही अनुभव असल्यामुळे अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या भंडारा विधानसभा क्षेत्रातून वंचित बहुजन आघाडी चे सर्वेसर्वा ऍड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी संधी दिल्यास विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ता अरुण गोंडाणे यांनी सांगितले. 
                         अरुण जाधोजी गोंडाणे वाकेश्र्वर(पहेला) येथील रहिवासी असून लगतच रावणवाडी हे पर्यटनस्थळ असून त्यांचे गाव भंडारा विधानसभेचे मध्यवर्ती ठिकाण आहे. या ठिकाणाहून भंडारा तालुक्यातील जवाहर नगर परिसर तसेच पवनी तालुक्यातील शेवटचे टोक असलेले कन्हाळगाव चे अंतर सारखेच आहे. ते रेस्टॉरंट व्यवसायिक असल्यामुळे त्यांचा भंडारा विधानसभा क्षेत्रातील अनेक गावातील सामाजिक कार्यकर्ते, तसेच बहुतांश सामाजिक संघटनांशी  निकटचा संबंध आहे. जिल्ह्यातील जगविख्यात "महासमाधी भूमी" रुयाळ(पवनी) येथील कार्यक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. या शिवाय सर्व धर्म समभाव या प्रमाणे त्यांची कार्यप्रणाली आहे. त्यांनी वाकेश्र्वर गावचे सरपंच पद, पहेला पंचायत समिती सदस्य म्हणून कारकीर्द गाजविली आहे. या शिवाय जिल्हा परिषद निवडणूकही लढविली आहे. सामाजिक कार्यकर्ता अरुण गोंडाणे यांनी शेकडो ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विधवा, परीतक्त्या, दुर्धर आजाराने ग्रस्त व्यक्तींना शासकीय योजनांचा लाभ व आर्थिक मदतही मिळवून दिली आहे. त्यांचा आंबेडकरी आंदोलनात नेहमीच सक्रिय सहभाग असल्याने आंबेडकरी विचारधारेस समर्पित वंचित बहुजन आघडीकडून लढण्याकरिता अनेक मान्यवरांनी त्यांना सूचना केली आहे. त्यांनीही वंचित बहुजन आघाडी कडून तिकीटाची मागणी केली आहे. वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांनी संधी दिल्यास पूर्ण ताकदीनीशी विधानसभा निवडणूक लढणार असे सामाजिक कार्यकर्ता अरुण गोंडाणे यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या