Ticker

6/recent/ticker-posts

💐 || सुमंगल सुप्रभात || 💐‌ 🌞 दिन विशेष 🌞

💐  || सुमंगल सुप्रभात ||  💐
‌          🌞 दिन विशेष  🌞
‌इसवी सन २०२४ - २५ आॕक्टोबर 
‌शालिवाहन शक १९४६, विक्रम संवत  २०८०
‌भा. रा. ३ कार्तिक १९४६.
युगाब्द ५१२६
संवत्सर नाम : क्रोधी
अयन: दक्षिणायण
ऋतू : शरद
मास : आश्विन 
पक्ष :  कृष्ण   
तिथी : नवमी (२७.२०) ~ दशमी       
वार :  शुक्रवार
नक्षत्र: पुष्य (०७.४०) ~  आश्लेषा                         
राशी :   कर्क 

*श्री चक्रपाणि प्रभु जयंती*

१८६१: टोरांटो स्टॉक एक्सचेंज सुरु झाले.
१९५१:स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्याच  निवडणूकांना सुरुवात झाली. हिमाचल प्रदेशातील चिन्नी येथे पहिले मतदान झाले. २१ फेब्रुवारी १९५२ रोजी या निवडणूकांचा शेवटचा टप्पा पार पडला. या निवडणुकीत ४५.७% मतदान झाले.
१९९५: भारताचे तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांनी संयुक्त राष्ट्राच्या सुवर्ण महोत्सवाच्या स्मरणार्थ आमसभेला संबोधित केलं.
१९९९: दक्षिण अफ्रिकेतील लेखक जे. एम. कोएत्झी यांना साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठेचे मानले जाणारे ’बूकर पारितोषिक’ दुसर्‍यांदा मिळाले.
२००९: बगदाद, इराक येथे झालेल्या दोन आत्मघातकी बॉम्बहल्ल्यात १५५ जण ठार तर ७२१ जण जखमी झाले.

जन्मदिवस :
१९४५:अपर्णा सेन – अभिनेत्री, चित्रपट निर्माती व पटकथालेखिका.
१९३८: साहित्य अकादमी पुरस्कार सन्मानित प्रसिद्ध लेखिका मृदुला गर्ग.
१९३७: संगीत समीक्षक डॉ. अशोक रानडे
१८८३: भारतीय भूगर्भीय सर्वेक्षणात काम करणारे पहिले भारतीय भूगर्भशास्त्रज्ञ दाराशॉ नोशेरवान वाडिया
१८८१:पाब्लो पिकासो – स्पॅनिश चित्रकार आणि शिल्पकार 
१८६४: डॉज ऑटोमोबाईल कंपनीचे सहसंस्थापक जॉन फ्रान्सिस लबाडी
१८००: ब्रिटीश राजनीतिज्ञ, कवी, इतिहासकार, निबंधकार व समीक्षक थॉमस बॅबिंग्टन मैकाले (Thomas Babington Macaulay) हा इंग्रज गव्हर्नरच्या भारतातील कौंसिल चा (१८३४-३८) सदस्य होता. त्याच्या मतानुसार भारतीय समाज सांस्कृतिक व बौध्दिक दृष्ट्या निकृष्ठ दर्जाचा होता  व त्याला इंग्रजी शिक्षण देऊन सुधारणे आवश्यक होते. (India is culturally and intellectually inferior society that was in need of modernization and Westernisation) त्यानेच भारतीय शिक्षण पद्धती मोडीत काढून इंग्रजांना अनुकूल शिक्षण सुरू केले.      

 मृत्यूदिन:
१९५५:पं. दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुसकर – शास्त्रीय गायक, ’पायोजी मैने रामरतन धन पायो’, ’ठुमक चलत रामचंद्र’, ’चलो मन गंगा जमुनातीर’ ही त्यांनी गायलेली काही अत्यंत लोकप्रिय गाणी आहेत. ’सुध मुद्रा, सुध बानी’ हे गायकासंबंधी सांगितलेले कलागुण त्यांच्यात प्रकर्षाने दिसत असत. गायनाचार्य पं. विष्णू दिगंबर पलुसकर हे त्यांचे वडील होत. परंतु बापूराव १० वर्षांचे असतानाच पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे निधन झाले. पुढे संगीताचे  शिक्षण त्यांनी पंडित विनायकराव पटवर्धन आणि पंडित नारायणराव व्यास तसेच पंडित चिंतामणीराव आणि पंडित मिराशी बुवा यांच्या कडे घेतले. 
१९६०: फर्ग्युसन कंपनी चे संस्थापक हॅरी फर्ग्युसन
१९८०:अब्दूल हयी ऊर्फ ’साहिर लुधियानवी’ – शायर व गीतकार 
२००३:पांडुरंगशास्त्री आठवले – कृतीशील विचारवंत आणि तत्त्वज्ञ. न्याय, वेदांत व्याकरण आदि शास्त्रांचा अभ्यास केल्यानंतर पौर्वात्य व पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचा त्यांनी तौलनिक अभ्यास केला. स्वाध्याय परिवाराचे प्रणेते.
२००५: ज्ञानपीठ पुरस्कार, संगीत नाटक अकादमी पुरस्कार तसचं, पद्मविभूषण पुरस्कार सन्मानित प्रख्यात भारतीय हिंदी भाषिक लेखक, कादंबरीकार, कार्यकर्ते आणि अनुवादक व साहित्यकार निर्मल वर्मा.
२००९:चित्तरंजन कोल्हटकर – अभिनेते 
२०१२:जसपाल भट्टी – विनोदी अभिनेते 

*।। दास-वाणी ।।* 

विनोदार्थी भरें मन । 
श्रृंघारिक करी गायेन । 
राग रंग तान मान । 
तो रजोगुण  ।। 

आळस उठे प्रबळ । 
कर्मणुकेचा नाना खेळ । 
कां उपभोगाचे गोंधळ ।
तो रजोगुण  ।। 

‍।। जय जय रघुवीर समर्थ ।। 
 दासबोध : ०२/०५/२४-२६ 

विनोद चुटके पांचटपणा मनापासून आवडतो. लावणी प्रेमगीते अशी शृंगारिक गाणीच गायला आणि ऐकायला आवडतात. रागरागिण्या आलापी हावभाव यामधे मन रमते.
एकंदरीत दिलदार रसिकता ही रजोगुणी वृत्ती आहे. प्रपंचामधे उत्तम मानली जाते, तर परमार्थाला घातक.

रजोगुणी माणसाला आळस फार. ऐसपैस छंदिष्ट राहाणीमान असते. खाणे, पिणे, करमणुकीचे विविध प्रकार मनापासून आवडतात तो रजोगुणी. स्वत:साठी आणि आपल्या कुटुंबियांसाठी उपभोगाची सर्व साधने कमावण्यात प्रचंड उत्साह, वेळ आणि पैसेही खर्च करण्यात ज्याला धन्यता वाटते आणि तीच इतिकर्तव्यताही मानतो तो रजोगुणी.

देव मुख्यत: सत्वगुणी, माणूस सहसा रजोगुणी तर दानव बहुधा तमोगुणी मानले जातात.

*रजोगुणलक्षणनाम समास.*
 
*संकलक : सुधीर देशपांडे  (आबा)*

 🙏 💐💐💐💐 💐 🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या