• मतदार संघ भाजपा की राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) गटाकडे
• साकोली विधानसभा क्षेत्रातील मतदारांत संभ्रम
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागतच आचार संहिता लागण्याचे १५ दिवसापूर्वी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड. बाळासाहेब उपाख्य प्रकाश आंबेडकर यांनी डॉ. अविनाश रघुनाथ नान्हे यांना वंचितची उमेदवारी जाहीर केली. तर महाविकास आघाडीनेही नुकतीच विद्यमान आमदार नाना पटोले यांचेवर विश्वास दर्शवून त्यांना पुन्हा तिकीट दिली आहे. पण नामांकन अर्ज दाखल करण्याचा चौथा दिवस असूनही महायुतीची भूमिका अजूनही स्पष्ट केली गेली नाही. त्यामुळे मतदारांत संभ्रम निर्माण झाला आहे. अर्जुनी/मोर. विधानसभा क्षेत्रात जो प्रकार घडला तोच प्रकार साकोलीतही घडणार काय ? अशा मतदारांत चर्चा होत असून या नाराजी नाट्याने राजीनामा सत्र सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नसली गरज वंचित, महाविकास आघाडीचे ठरले पण महायुतीतील घटकपक्षाचे काय ? या चर्चांना साकोली विधानसभा क्षेत्रात पेव फुटले आहे.
साकोली विधानसभा क्षेत्रात लाखनी साकोली व लाखांदूर या तालुक्यांचा समावेश होत असून क्षेत्र पूनररचने नंतर साकोली विधानसभा मतदार संघावर भारतीय जनता पार्टीचे वर्चस्व राहिले आहे. या मतदार संघावर महाविकास आघाडीतून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे तर महायुतीतील भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) गटाचे प्राबल्य आहे. विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी व महाविकास आघाडीने आपापल्या उमेदवाराची घोषणा केली. पण महायूतीत साकोली विधानसभा मतदार संघ भारतीय जनता पार्टी की राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) गटाकडे ? असा संभ्रम निर्माण झाला आहे किंवा अर्जुनी/मोर विधानसभा क्षेत्रात जो प्रकार घडला म्हणजेच भारतीय जनता पक्षाचे माजी समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले यांनी हाताला घड्याळ बांधून घड्याळ या बोधचिन्हावर निवडणूक लढणार आहेत. तो कित्ता साकोली विधानसभा क्षेत्रात गिरवणार आहे का ? असा मतदारांत संभ्रम आहे. कारण हे मतदार संघ भाजपा चे वाट्याला येईल म्हणून इच्छुक उमेदवारांकडून तसे प्रयत्नही चालविले जात असताना अचानक राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) गटाकडून दिघोरी/मोठी चे जिल्हा परिषद सदस्य अविनाश ब्राह्मणकर यांनी साकोली विधानसभा क्षेत्रात परिवर्तन यात्रा काढल्यामुळे त्यांना भाजपात घेऊन भाजपाचे कमळ चिन्हावर विधानसभा निवडणूक तर लढणार नाही ना ? अशी शंका निर्माण होत आहे.
नामांकन अर्ज दाखल करणे २२ ऑक्टोबर पासून सुरू झाले असून महाविकास आघाडीतील कोणत्या घटकपक्षाला साकोली विधानसभा क्षेत्र सुटेल. याचा तिढा मात्र कायम आहे. या मतदार संघाचा विचार करता साकोली विधानसभा मतदार संघ भाजपाकरिता सोडण्यात यावा. अशी कार्यकर्त्यांची मनोमन इच्छा आहे. पण पक्ष श्रेष्ठींच्या मनात काय चालले आहे किंवा महायुती चा दुसरा घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) गटासोबत काय वाटाघाटी झाल्या. या बाबद थांगपत्ता कार्यकर्त्यांना लागलेला नाही. साकोली विधानसभा क्षेत्र भाजपाचे वाट्याला न आल्यास नाराजी स्वरूपात राजीनामा नाट्य अथवा बंडखोरी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजपा कार्यकर्त्यांच्या तीव्र भावना पक्षश्रेष्ठीपर्यंत पोहचल्यामुळे पुढील अनर्थ टाळण्यासाठी उमेदवाराचे नाव जाहीर करण्यात विलंब हित असल्याचा एक मतप्रवाह आहे. राजकीय पार्श्वभूमी काहीही असली तरी भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्वेसर्वा यांच्यात ज्या वाटाघाटी होतील त्यानुसारच उमेदवार ठरेल किंवा अर्जुनी/मोर. विधानसभा क्षेत्रात महायुतीच्या वतीने जो फॉर्म्युला तयार करण्यात आला. तोच फॉर्म्युला साकोली विधानसभा क्षेत्रातही राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार नाना पटोले व महायुतीकडून डॉ. परिणय फुके यांना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून अविनाश ब्राह्मणकर यांना विधानसभेचे तिकीट झाल्यास तुल्यबळ लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सद्यस्थितीत बौद्ध समाज अनुसूचित जाती-जमातीचे उपवर्गीकरण व क्रिमीलेअर लागू करण्याकरिता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य सरकारने एक सदस्यीय समिती गठीत केल्यामुळे महाविकास आघाडीवर नाराज आहे. त्यामुळे ही मते आंबेडकरी विचारधारेच्या पक्षाला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. अविनाश नान्हे हेही लढतीत राहतील. यात तिळमात्र शंका नाही. पार्श्वभूमी काहीही असली तरी वंचित बहुजन आघाडी व महाविकास आघाडीतील घटकपक्ष काँग्रेस ने आपापले उमेदवार जाहीर केले असले तरी नामांकन अर्ज दाखल करण्याचे चौथे दिवशीही महाविकास आघाडीतील तिढा सुटण्याचे चिन्ह दिसत नसल्यामुळे वंचित, महाविकास आघाडीचे ठरले, महायुतीतील घटकपक्षांचे काय? असा मतदारांत संभ्रम निर्माण झाला आहे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
0 टिप्पण्या