बाभुळवाडे गावातील शिव पाणंद शेतरस्त्यांची २३ जुलै पासून मोजणी
चित्रा न्युज प्रतिनिधी
अहमदनगर :-ग्रामसभेच्या ऐतिहासिक निर्णयानंतर शिव पाणंद शेतरस्ता चळवळीच्या माध्यमातून राज्यातील बाभुळवाडे गाव रोड मॉडेल व्हिलेज करण्यासाठी गावात विशेष ग्रामसभा घेऊन गा गावनकाशावरील शेतरस्त्यांची अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी गावशिवार फेरी काढत पाहणी केली यावेळी तालु भुमिअभिलेखचे उपअधिक्षक माधवराव पाटील यांनी शेतरस्तांच्या मोजणीचे आश्वासन दिले होते त्याप्रमाणे बाभुळवाडे गाव ते लाणीमावळा शिवरस्ता, बाभुळवाडे गाव ते वडझिरे शिवरस्ता, बाभुळवाडे गाव ते आळकुटी शिवरस्ता, गावठाण ते पाझर तलाव शिवरस्ता मोजणीचे दि.२३ जुलै पासून मोजणी सुरू करण्यासंदर्भातील अधिकृत पत्र पारनेर तालुका भुमिअभिलेखचे उपअधिक्षक माधवराव पाटील यांनी पत्र ग्रामस्थांकडे सुपर्द केले असुन यामध्ये भूकरमापक धमेंद्र जाधव,भूकरमापक अभय कुलकर्णी, कुंदन हराळे भूकरमापक यांची नियुक्ती मोजणीसाठी नियुक्ती करण्यात आली असुन ग्रामस्थांसह शिव पाणंद शेतरस्ता चळवळीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासणाचे आभार मानले पुढील तयारी रोड मॉडेल व्हिलेज बाभुळवाडे कृती समितीचे समन्वयक/सदस्य शरद पवळे साहेब,बाळासाहेब नवले, प्रमोद खणकर,गुलाबराव नवले,दिलीप बोरुडे,हनुमंत खणकर,भिवाजी जगदाळे,भाऊसाहेब पावडे,सचिन जगदाळे,सविता जगदाळे,सविता बोरुडे आदींसह बाभुळवाडे ग्रामपरिवार / महाराष्ट्र राज्य शिव पाणंद शेतरस्ता चळवळीचे पदाधिकारी करणार आहेत याकामी तालुक्यातील विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह पत्रकार बांधवांचे विशेष मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे शिवपाणंद शेतरस्ता चळवळीचे शरद पवळे यांनी वृत्तपत्रांशी बोलताना सांगितले.
0 टिप्पण्या