Ticker

6/recent/ticker-posts

भाजपा अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष पदी गफ्फारभाई पठाण यांची निवड...

सुजित धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/ 9615179615

जामखेड :-सामाजिक कार्यकर्ते तथा धडाडीचे माजी सरपंच गफ्फारभाई पठाण यांची भारतीय जनता पार्टीच्या अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष पदी अल्पसंख्यक चे जिल्हा अध्यक्ष तैय्यब भाई बेग यांनी निवड केली असून या निवडीचे पत्र माजी मंत्री तथा आमदार प्रा.राम शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले.
     पक्षाच्या ध्येय धोरण लक्षात घेऊन अल्पसंख्यांक समाजातील अडी अडचणी सोडवण्यासाठी काम करणारा असून पक्ष वाढीसाठी मोठे संघटन करणार आहे.

यावेळी जिल्हा परीषद सदस्य अशोक  खेडकर, काकासाहेब धांडे, भिमराव गायकवाड,भागवत जगदाळे महाराज, बाबासाहेब बामणे, पाटोदा येथील खालेद पठाण ,सिद्दीक शेख मुजाहीद पठाण, रमजान सय्यद, आरबाज सय्यद, आनिस पठाण,जैद पठाण उपस्थित होते.
     या निवडीबद्दल तालुका अध्यक्ष जमीर बारूद, शहराध्यक्ष प्रा.जाकीर शेख आदींनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या