Ticker

6/recent/ticker-posts

जनतेच्या मना मनातील उमेदवार नरेंद्र पहाडे यांनी घेतले वीर हनुमानाचे दर्शन पूजा अर्चा,नमन करून नारळ फोडून प्रचाराचे रणशिंग फुंकले



 चित्रा न्युज ब्युरो
 भंडारा :-भंडारा पवनी विधानसभा क्षेत्राचे शेतकरी, शेतमजूर, कामगार, भूमीहीन, सुशिक्षित बेरोजगार, गोरगरीब,शोषित पिडीत  जनतेच्या मना मनातील लोकप्रिय युवा, झुंजार उमेदवार  नरेंद्र  पहाडे   यांनी पदाधिकारी ,कार्यकर्त्यांसह भंडारा शहरातील मोठा बाजार स्थित    हनुमान मंदिरातील आराध्य दैवत महाबली  बजरंग बली हनुमान  तसेच  मेंढा येथील भृशुंड मंदिर ,मैत्री बुद्ध विहार,  शुक्रवारी येथील शिवाजी  महाराज यांचा पुतळा व  नांगरधारी शेतकरी  पुतळा  आणि शहरातील विविध भागातील आराध्य दैवत कुलस्वामीनिंची विधिवत पूजा अर्चना केली आणि  वंदन करून  प्रचाराचा नारळ 
फोडला.
  तसेच  कोटी कोटी जनतेचे आदर्शवत राजमाता जिजाऊ, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता अहिल्याबाई होळकर, राणी दुर्गावती,राष्ट्रपिता महात्मा गांधी,क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले,क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले,शिक्षिका फातिमा शेख,भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद , क्रांतिवीर बीरसा मुंडा,साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,विश्व संत तुकाराम महाराज ,राष्ट्र संत तुकडोजी महाराज,कर्मयोगी गाडगेबाबा,संत रविदास,संत कबीर,संत जगनाडे महाराज, महानत्यागी संत जुमदेवाबाबा यांच्या प्रतिमेस  पुष्पांजली अर्पण व दीप प्रज्वलित करून विनम्र अभिवादन केले आणि भंडारा पवनी विधानसभा निवडणुक प्रचाराचे रणशिंग फुंकले.
     यावेळी जनतेच्या मना  मनातील उमेदवार नरेंद्र पहाडे यांनी भंडारा पवनी विधानसभा क्षेत्रातील शेतकरी , शेतमजूर, कामगार, भूमीहीन, सुशिक्षित बेरोजगार, गोरगरीब,शोषित पिडीत ,सर्वसामान्य जनतेचे प्रश्न,समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न  करणार आणि भंडारा पवनी विधानसभा क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध राहणार तसेच आयुष्यभर शेवटच्या श्वासापर्यंत परमार्थ शील, परोपकारी,समर्पित भावनेने जनतेची सेवा करण्याची शपथ घेतली .
  याप्रसंगी जनतेच्या मना मनातील उमेदवार नरेंद्र पहाडे यांच्यासह पदाधिकारी ,कार्यकर्ते ,मित्र मंडळी तसेच हितचिंतक बहुसंख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या