Ticker

6/recent/ticker-posts

राजर्षी शाहू विकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांना पॅंथर आर्मीने दिला जाहीर पाठिंबा



चित्रा न्युज ब्युरो
शिरोळ : पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेने शिरोळ विधानसभा मतदारसंघातील राजर्षी शाहू विकास आघाडीचे 
 उमेदवार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांना जाहीर पाठींबा दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील बहुजन समुदायाच्या विकासासाठी राबविल्या जाणाऱ्या धोरणांमध्ये डॉ. यड्रावकर यांचे महत्वाचे योगदान आहे. त्यांच्या विकसनशील नेतृत्वामुळे शिरोळ तालुक्यातील बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास झाला आहे.
आमदार यड्रावकर हे समाजातील उपेक्षित व वंचित घटकांच्या प्रगतीसाठी कार्यरत असलेल्या नेत्यांपैकी एक असून, त्यांचा समाजासाठी असलेला दृष्टिकोन आणि तळमळ विशेष लक्षवेधक असल्याचे संतोष आठवले यांनी  सांगून अशा नेत्याला विकास करण्याची संधी यापुढेही देण्यासाठी पॅंथर आर्मीच्यावतीने पाठिंबा देत असल्याचे सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या