लिंगोली कदम जिल्हा प्रतिनिधी ग्रामीण नांदेड :
नांदेड :-हिमायतनगर तालुक्यातील मौजे सरसम (बु) येथील युवा पत्रकार, विद्रोही साहित्यिक, जणसामान्य,गोरगरीब,वंचित बहुजनांच्या समस्या पोटतिडकीने मांडून न्याय मिळवून देण्यासाठी धडपडणारे पत्रकार विजय नारायण वाठोरे यांची पद्मश्री नामदेव ढसाळ यांनी संस्थापित केलेल्या,सामाजिक न्यायासाठी, समानतेसाठी व दलित हक्कासाठी कार्य करणाऱ्या ' दलित पॅंथर ' या संघटनेच्या हिमायतनगर तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष बुद्धभूषण गोटे यांनी नियुक्ती पत्र देत पत्रकार वाठोरे यांच्या पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेत तालुका अध्यक्ष पदाची धुरा त्यांच्यावर सोपवली आहे.या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन केले जात आहे.निवड झाल्याबद्दल जेष्ठ पत्रकार गंगाधर वाघमारे, कानबा पोपलवार, पाशा खतीब,दाऊ गाडगेवाड,दै. लोकशक्ती चे संपादक रमेश पंडित, विष्णू जाधव,अंगद सुरोशे,लिंगोजी कदम करंजीकर ,प्रभू कदम, राम चिंतलवार,से.नि. मुख्याध्यापक संघपाल वाठोरे,सहशिक्षिका बेबीनंदा सोनवणे,कालिंदा नारायण वाठोरे,चंद्रमनी वाठोरे,,डॉ.संदेश नांदेडकर,मुंबई हायकोर्टाचे क्लार्क सुमेध वाठोरे,राजरतन वाठोरे, लंकेश वाठोरे, संघप्रिया कवडे यांच्यासह अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
0 टिप्पण्या