• गोंडेगाव येथील घटना
• क्षेत्र सहाय्यक मुकेश श्यामकुवर घटनास्थळावर
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- वन परिक्षेत्र अधिकारी अड्याळ चे अधिनस्त असलेल्या सहवनक्षेत्र किटाडी चे अंतर्गत गोंडेगाव येथील गोटफार्म वर बिबटाने हल्ला करून ८ शेळ्यांना ठार केल्याची घटना शुक्रवार(ता.१ नोव्हेंबर) रोजी सकाळचे सुमारास उघडकीस आली. घटनेची माहिती क्षेत्र सहाय्यक मुकेश श्यामकुवर यांना देण्यात आली. त्यांनी घटनास्थळावर जाऊन मृत शेळ्यांचा पंचनामा केला. तसेच पशूधन अधिकारी कनेरी/दगडी यांनी शव विच्छेदन करून १ लाख रुपये नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला. नुकसानग्रस्त गोटफार्म संचालकाचे नाव देवाजी दशरथ वाढई, रा. गोंडेगाव, तालुका लाखनी असे आहे. या घटनेमुळे पशूपालकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेती परवडेनासी झाल्यामुळे शेतीस पूरक व्यवसाय म्हणून शेतकरी पशू पालनाचा व्यवसाय करतात. देवाजी वाढई गोंडेगाव यांनी आपल्या शेतात गोटफार्म तयार केले असून या ठिकाणी अनेक शेळ्या व बोकड आहेत. गुरुवारी रात्रीचे सुमारास या गोटफार्म मध्ये शिरून बिबटाने शेळ्यांवर हल्ला करून ८ शेळ्यांना ठार केले. सकाळी रखवालदार या गोटफार्ममधील शेळ्यांना चारापाणी करण्यासाठी गेला असता घटना उघडकीस आली. घटनेची माहिती क्षेत्र सहाय्यक मुकेश श्यामकुवर यांना देण्यात आली. वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक यवतकर यांचे मार्गदर्शनात क्षेत्र सहाय्यक मुकेश श्यामकुवर यांनी वन कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन गावकरी व गोटफार्म संचालक यांचे प्रमुख उपस्थित मृत शेळ्यांचा पंचनामा करून पशू वैद्यकिय अधिकारी कनेरी/दगडी यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी घटनास्थळी येऊन मृत शेळ्यांचे शवविच्छेदन करून १ लाख रुपये नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविला. तसेच मृतक शेळ्यांना पुरण्याच्या सूचना केल्या. या घटनेने पशू पालकांसह गावकऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वन विभागाने या बिबटाचा बंदोबस्त करावा. अशी मागणी होत आहे.
0 टिप्पण्या