• शिवस्मारक समिती शिवनगर लेआऊट लाखनी चा उपक्रम
कालिदास खोब्रागडे चित्रा न्युज
भंडारा :- शिवस्मारक समिती लाखनीच्या वतीने शिवनगरी ले आऊट येथे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दीपोत्सव, शिवपुजन सोहळा व सेवानिवृत्त शिक्षक मुकेश लांबकाने यांचा सपत्नीक सत्कार सोहळा शुक्रवार(ता.१ नोव्हेंबर) रोजी पार पडला. शिवनगरी लेआऊट येथील शिवस्मारक परिसरात परिसरातील कुटुंब एकत्र येऊन सामूहिक दीपोत्सव साजरा करतात. घरचे लक्ष्मीपूजन आटोपल्यानंतर सर्वजण शिवस्मारक जवळ एकत्र येतात. परस्परांना दीपावलीच्या शुभेच्छा देऊन सामूहिक दीपावलीचा उत्सव साजरा करतात. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे पूजन करून रीतसर दीपोत्सवला सुरवात करतात. यावर्षी शिवस्मारक समितीचे सदस्य मुकेशजी लामकाने हे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहघाटा, तालुका साकोली येथून ३१ ऑक्टोबर २०२४ ला सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्ताने त्यांच्या सेवानिवृत्तीपर कार्यक्रम शिवस्मारक समिती आणि शिवनगरी ले आऊट च्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी आयोजित करण्यात आला. शिवपुजनाची सुरवात प्रवीणजी शेलार यांच्या अध्यक्षतेखाली समितीचे उपाध्यक्ष राजकुमार खोब्रागडे, सचिव जगदीश धांडे, विनोद बांते, नारद गिऱ्हेपुंजे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. याप्रसंगी शिवगर्जना अर्णव सिंगनजुडे तर जिजाऊवंदना व शिवआरती स्मिता सिंगनजुडे, वीरा कुंभरे व अर्णव सिंगनजुडे यांनी अर्पण केली. सेवानिवृत्ती सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद सदस्या विद्या कुंभरे, प्रमुख अतिथी विकास गायधने, प्रविण शेलार व सत्कारमुर्ती मुकेश लामकाने व प्रमिला लामकाने शिव विचारपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते श्री व सौं लामकाने यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन व प्रस्ताविक उमेश सिंगनजुडे तर आभार ज्ञानेश्वर येळेकर यांनी मानले. सुधीर कुंभरे, रितेश लांडगे, निलकंठ येवले, यशवंत कानतोडे, धनराज ठवकर, नरेंद्र वालुरकर, राजू बडवाईक, निखिल क्षीरसागर, अमित जगनाडे, वैभव लामकाने, अर्चना बांते, नोबिना बडवाईक, रजनी धांडे,अवंती सिंगनजुडे, आस्था बांते, नलिनी गिऱ्हेपुंजे, योगिता खोब्रागडे, बबिता येळेकर, उमादेवी येळेकर, सविता वालुरकर, शिल्पा यवले, कुणाली यवले, सोनू क्षीरसागर, वीरा कुंभरे, रिया कुंभरे व तरंग बडवाईक यांनी विशेष परिश्रम घेतले.
0 टिप्पण्या