लाखांदूर तालुक्यातील एका सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रताप
बौद्ध मतांचे ध्रुवीकरणाचा प्रयत्न
चित्रा न्युज ब्युरो
भंडारा :- डिसेंबर २०२२ मध्ये लाखांदूर येथील एका सामाजिक संस्थेकडून भव्य धम्म संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात संस्थेच्या एका पदाधिकाऱ्याने आपण राजकीय संन्यास घेत असून यापुढे समाजकारणच करू, असे जाहीर केले होते. त्याच पदाधिकाऱ्याने विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील एका राजकीय पक्षाच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दील्याबबद कळविल्याचे काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांचे स्वाक्षरीचे पत्र समाज माध्यमांवर व्हायरल होत असून त्यात ३ संस्थांचा उल्लेख आहे. त्या तिन्ही संघटनांशी या समाजसेवकाचा प्रत्यक्ष संबंध असल्याने समाजकारणाचे आड राजकीय पक्षाला समर्थन दिल्याचा प्रकार उघडकीस आल्याने आंबेडकरी विचारधारेच्या मताचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न या समाजसेवकाकडून होत असल्याचा आशय बाळगून उपावर्गिकरणाच्या मुद्द्यावरून त्याच पक्षाशी नाराज आंबेडकरी मतदारांत संभ्रम निर्माण झाला आहे.
सदर समाजसेवकाने अनेक राजकीय व प्रादेशिक पक्षात काम केले. पण कुठेही त्यांचे पाय टिकले नाही. त्यामुळे त्याने ३ वर्षापूर्वी एक सामाजिक संघटना स्थापन करून त्या संघटनेचे पदाधिकारी झाले. कालांतराने या संघटनेतून काही कार्यकर्ते पदाधिकारी घेवून एक संस्था रजिस्टर केली. त्या समिती मार्फत डिसेंबर महिन्यात लाखांदूर येथे भव्य धम्म संमेलनाचे आयोजन करण्यात येते. या पदाधिकाऱ्याने लोकसभा निवडणूकीपूर्वी संविधान बचाव संघर्ष समिती स्थापन करून जिल्ह्यात यात्राही काढली होती. त्यानंतर विधानसभेची निवडणूक लागणार हे हेरून गटातटात विभागलेल्या रिपब्लिकन पक्षाचे एकत्रीकरणाचा विडा उचलला होता. त्या करिता भंडारा, नागपूर व मुंबई येथे आंबेडकरी विचारधारेतील सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संघटनेच्या पुढाऱ्यांना आमंत्रित करून एकिकरणाचा प्रयत्न केला. पण यश आल्याचे दिसत नसल्यामुळे एकिकृत रिपब्लिकन समिती(विदर्भ) ची स्थापना केली. पण पदरी निराशा पडल्यामुळे काय करावे आणि काय करू नये. या विवंचनेत तो समाजसेवक असल्यामुळे त्याच्या कारवाया थंडावल्याचे जिल्ह्यात चित्र दिसत असतानाच ९ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष आमदार नाना पटोले यांचे स्वाक्षरी असलेले पत्र समाज माध्यमांवर व्हायरल झाले आहे. त्यात ३ संघटनेच्या 4 पदाधिकाऱ्यांकडून महाविकास आघाडीच्या भंडारा जिल्ह्यातील सर्व उमेदवारांना समर्थन देण्याबाबतचे कळविले असून भाजपा प्रणित महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या वर्गीकरण समितीच्या भूमिकेबद्दल विचारणा केली असून सदर समितीला आमचा विरोध आहे. तथा वर्गीकरण समिती रद्द करण्याबाबदची आमची भूमिका राहील असे नमूद आहे. या पत्रात ज्या ३ संघटनांचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यात लाखांदूर येथील धम्म मेळाव्यात राजकीय संन्यास घेणाऱ्या एका सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्याचे नाव असून त्याचा या तिन्ही संघटनांशी प्रत्यक्ष संबंध असून समाजकारण करणाऱ्याने एका विशिष्ट राजकीय पक्षाला समर्थन देणे. ही बाब अनाकलनीय असून या प्रकाराने आंबेडकरी विचारधारेच्या मतांचे ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न होत असल्याने आंबेडकरी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. भव्य धम्म संमेलनासारख्या सामाजिक कार्यक्रमात राजकीय संन्यास घेऊन समाजकारण करणाऱ्याचे जाहीर करणाऱ्या या समाजसेवकाने केलेल्या विरोधी कृतीबाबद जिल्ह्यात खमंग चर्चा होत आहेत.
पदाधिकारी अनभिज्ञ
सदर प्रकारचे पत्र सोशल मीडियावर वायरल होताच पत्रात नमूद एका संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनाही याचा अचंबा बसला. त्यामुळे, पत्र व्हायरल झाल्याच्या दुसऱ्या दिवशी काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेण्यात आली. यावेळी, काही पदाधिकाऱ्यांनी अशा समर्थनाला किंवा पत्राला स्पष्ट विरोध दर्शविला. विशेष म्हणजे, या प्रकाराची त्या संस्थेतील पदाधिकाऱ्यांनाही कुणकुण किंवा कसलीही माहिती नसल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.


0 टिप्पण्या