Ticker

6/recent/ticker-posts

गावकऱ्यांनी दिले जखमी निलगायीला जीवदान

• निलागोंदी येथील घटना 

चित्रा न्युज ब्युरो
भंडारा :-लाखनी  येथील वन परिक्षेत्र अधिकारी कार्यालयाचे अधिनस्त निलागोंदी येथे गावालगत चराईकरिता आलेल्या मादा निलगायीवर अचानक कुत्र्यांनी हल्ला केल्याने जखमी अवस्थेत गावात आलेली निलगाय नालीवर ठेवलेल्या जलाऊ काड्यांचे ढीगाऱ्यात अडकल्याने गावकऱ्यांनी निलगायीला कुत्र्यांचे तावडीतून सोडवून वन कर्मचाऱ्यांचे स्वाधीन करून जीवदान देऊन मानवतेचा परिचय दिल्याने गावकऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. 
                      वन परिक्षेत्र लाखनी चे अधिनस्त वनरक्षक बीट निलागोंदी हे मोठ्या झाडाचे पुरातन वनक्षेत्र म्हणून ख्यातीप्राप्त असून यात तृणभक्षी प्राणी, हिंस्त्र श्वापदे व सरपटणाऱ्या प्राण्यांचा अधिवास असून वन क्षेत्रालगत गाव असल्यामुळे तृणभक्षी प्राणी चराईसाठी नेहमीच गावाशेजारी येत असतात. पाळीव कुत्रे तृणभक्षी प्राण्याचा पाठलाग करून शिकार करीत असतात. असाच प्रकार निलागोंदी येथे शनिवारी सायंकाळचे सुमारास उघडकीस आला. गावालगत चराईसाठी आलेल्या रानगायीवर कुत्र्यांनी हल्ला केल्याने जखमी अवस्थेत निलगाय गावात आली. पण सिमेंट काँक्रिट नालीवर ठेवलेल्या जलाऊ काळ्याचे ढीगात फसल्याची बाब गावकऱ्यांचे निदर्शनास येताच उपसरपंच महेश हटवार, सामाजिक कार्यकर्ते विलास भुरे, थामेश्वर वंजारी, यशवंत हटवार, गुरुदेव शेंडे यांनी निलगायीला कुत्र्यांचे तावडीतून सोडवून सहाय्यक वन संरक्षक संजय मेंढे यांना भ्रमणध्वनीवरून घटनेची माहिती दिली त्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून जांभळी चे क्षेत्र सहाय्यक एस.बी. उईके, मुंडीपार चे वनरक्षक आर.एस. भराडे, जांभळी चे वनरक्षक बी. बी. निश्चित, बरडकिन्ही चे वनरक्षक सुधीर कुंभरे व वनमजूर यांना रेस्क्यू साठी पाठविले त्यांनी निलगायीला ताब्यात घेऊन सुस्त होईपर्यंत रखवाली केली. काही वेळाने निलगाय सुस्त होऊन जंगलात पळाली. जखमी निलगायीला कुत्र्याचे तावडीतून सोडवून जीवदान देऊन गावकऱ्यांनी मानवतेचा परिचय दिल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या