सचिन बन्सोड गोंदिया
गोंदिया :-या 15 व्या महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडी, महायुती, तिसरी आघाडी , स्वतंत्र उमेदवार व तत्सम राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आपले शक्तिप्रदर्शन करीत नामांकन दाखल केलेले आहेत.
दरम्यान अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघातून पण महाविकास आघाडी, महायुती आणि स्वतंत्र उमेदवारांनी मोठ्याप्रमाणात आपआपले नामांकन दाखल केले आहेत.
त्यातच महायुती मधे समान वागणूक मिळत नसल्याची खंत व्यक्त करीत आरपीआय आठवले गटाचे विदर्भ सचिव यशवंत उके यांनी पण त्यांच्या समर्थकांच्या साक्षीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
यशवंत उके यांचा आरोप आहे की, भारतीय जनता पक्ष तसेच महायुतीतील तत्सम पक्षातील स्थानिक नेते आरपीआय आठवले गटाला डावलण्याचा कायमच प्रयत्न करित असतात आणि युतीच्या कार्यक्रमांपासून अलिप्त ठेवण्याचा प्रकार करित असतात.
नाईलाजास्तव आम्ही अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघातून स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केले आहे असे ते बोलत होते.
यशवंत उके यांची क्षेत्रात राजकारणासोबतच समाजकारणावर पण पकड आहे. ते आरपीआय आठवले गटाचे विदर्भ सचिव असून एका ख्यातनाम व्यसनमुक्ती संघटनेचे वरिष्ठ पदाधिकारी सुद्धा आहेत. या ना त्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडविण्यात ते कायम अग्रेसर असतात. पंचक्रोशीत त्यांची प्रतिमा निश्वार्थ समाजसेवी अशीच आहे.
त्यांचा जनसंपर्क संपूर्ण मतदारसंघात आहे.
या सर्वच बाबी लक्षात घेता अर्जुनी-मोरगाव विधानसभा मतदारसंघात यशवंत उके हे गेम चेंजर ठरतील अस म्हटल तर वावगं ठरणार नाही.
0 टिप्पण्या