Ticker

6/recent/ticker-posts

योगप्रेमी व ज्येष्ठ नागरिकांनी केले धार्मिक, रमणीय स्थळांचे दर्शन

चित्रा न्युज ब्युरो
भंडारा: योग आणि प्राणायामाद्वारे शरीर निरोगी ठेवत, आध्यात्मिक, नैसर्गिक आणि रमणीय ठिकाणी आपल्या अमूल्य क्षणांचा आनंद लुटण्यासाठी नुकतेच पतंजली योग समिती (मिस्कीन गार्डन) भंडारा यांच्याद्वारे योगप्रेमी व ज्येष्ठ नागरिकांसाठी सहलीचे आयोजन करण्यात आले. या सहलीत माडगी देवस्थान, बह्याबाबा देवस्थान (केसलवाडा), डाकराम सुकळी, बोदलकसा जलाशय, चोरखमारा जलाशय, चांदोरी (फार्म हाऊस) आदी ठिकाणांना भेट देण्यात आली.

प्रसंगी सकाळी ८.१५ वाजता राजीव गांधी चौकातून बसने माडगीकडे मार्गस्थ झाली. सकाळी ९.३० वाजता माडगी येथे पोहोचून साई मंदिराच्या परिसरात वैनगंगा नदीकाठी मॅट टाकून नाश्ता करण्यात आला. त्यानंतर मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तुमसर-तिरोडा मार्गे एडमाकोटच्या वाटेने केसलवाडा येथे बह्या बाबा मंदिरात दर्शन घेऊन सायंकाळी कुकडे यांच्या निवासस्थानी पोहोचले. तेथे सर्वांचे स्वागत करून चहा, बिस्किट आदींचा नाश्ता करण्यात आला.

त्यानंतर डाकराम सुकळी येथे चक्रधर स्वामी मंदिरात दर्शन घेण्यात आले. येथे विठ्ठलराव सेलोकर यांनी ११७० साली चक्रधर स्वामी डाकराम सुकळी येथे भिक्षा घेण्यासाठी येऊन मंदिरात भोजन व विश्रांती घेतल्याची कहाणी सांगितली. त्या काळात त्या मंदिरात सिंह राहत असे; मात्र तेथे सिंह लोकांना दिसला नाही, असे सांगण्यात आले.

यानंतर बोदलकसा जलाशय या पर्यटन स्थळाला भेट दिली. येथे रात्री विश्रांतीसाठी एमटीडीसी रिसॉर्ट होते आणि नौकाविहाराचीही सोय होती. उपस्थितांनी नौकाविहाराचा आनंद घेतला. सायंकाळी ६ वाजता साकोली येथील नंदू गहाने यांच्या फॉर्महाऊसवर पोहोचले, जिथे जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. येथे सेंद्रिय व गांडूळ खताचे नियोजन, गूळ, श्रीखंड, तूप उत्पादन पाहून सर्वजण भारावून गेले.

रात्री ८ वाजता तेथून प्रस्थान करून रात्री ९.१५ वाजता भंडारा येथे परतले. या सहलीत शाम कुकडे, अतुल वर्मा, उद्धव डोरले, शिवचरण राऊत, चिंधुजी बुधे, हरिभाऊ ठोटे, सदानंद इलमे, गुरुप्रसाद पाखमोडे, अनिल शेंडे, सतराम कौरानी, ललित बिसेन, सुधीर गुप्ता, अशोक घेंई, किशन शेंडे, शिवशंकर म्हस्के, गोपाल माटूरकर, विठ्ठलराव सेलोकर, हिवराज उके, धनराज साठवने, मोहबे, संदीप पात्रे, पुरुषोत्तम वैद्य, मधुकर गभने, आत्माराम बेदरकर, अशोक साकुरे, श्रीराम शिवनकर, रत्नाकर लेदे, प्रभुदास पराते, राजेंद्र देशमुख, दशरथ कारेमोरे, मधुकर बोंद्रे, सेवकराम हातझाडे, विष्णुदास जगनाडे,पुरुषोत्तम साकूरे ,रामेश्वर येळणे, गणेश मोटघरे, शामराव सार्वे, अशोक साकुरे, प्रभु मडावी, नत्थूजी राखडे महाराज, तुलसीराम नवखरे, किरण धांडे, तुलसीराम कडव, अरुण खेड़ीकर, अशोक मेश्राम आदी ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. दि भंडारा महिला नागरी पत संस्था भंडारा यांच्या सी एसआर निधीतून बस ची व्यवस्था करण्यात आली होती.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या