Ticker

6/recent/ticker-posts

अड्याळ च्या् विविध समस्यांबाबत सोहेल खान यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिले निवेदन

चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा :- राष्ट्रीय महामार्ग 247 भंडारा_निलज महामार्गाचे काम जवळपास 9 वर्षांपासून सुरू असून अद्यापही पूर्ण झालेले नाही.  भंडारा जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून या महामार्गाच्या मध्यभागी अड्याळ गावाचा समावेश होतो.  या गाव  मोठा असल्याने गावाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत सुमारे 1 किलोमीटर अंतरावर नाली, नळपाईप लाईन, स्ट्रीट लाईट टाकण्यात आले आहेत, व रस्त्याची इंची वाढल्याने अशोक नगर, कीटाडी रोड, गणेश सभागृह आवारात पावसाच्या पाण्याचा प्रभाव वाढतो. तसेच नळ पाईपलाईनच्या अंतरामुळे, नळ कनेक्शन देण्यास अडचणी येत आहेत. गावाच्या सुरुवातीपासून (गौरी पुलापासून) शेवटपर्यंत (सहयतनगर) पर्यंत, नळाच्या पाईपलाईन, स्ट्रीट लाइट बसवावेत जेणेकरून गावातीलके समस्या दूर होऊन अड्याळ गावातील लोकांना त्रास व अडचणींना सामोर जावे लागणार नाही. या विषयावर चर्चा करून विनंती करण्यात आली व निवेदन देण्यात आले.  ही समस्या लवकरच सोडवली जाईल, असे आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या