चित्रा न्युज ब्युरो
भद्रावती : एका विवाहित महिलेने सासरच्या सततच्या जाचाला कंटाळून आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दिनांक 13 जानेवारीला भद्रावती शहरालगतच्या वेकोलीच्या एकता नगर वसाहतीत क्वाॅटर नंबर 72 ब्लॉक नंबर 22 येथे घडली
या बाबत सविस्तर माहिती कि रुबी पवन राय, वय 32 वर्षे, राहणार एकता नगर डब्ल्यूसीएल वसाहत असे मृतक विवाहित महिलेचे नाव असुन रुबी या महिलेने सासरच्या मंडळी कडून सततच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे.
मृतक महिला ही वेकोलीच्या एकता नगर वसाहतीत आपल्या कुटुंबासह राहत होती. तिने सासरच्या जाचाला कंटाळून दिनांक 13 जानेवारीला आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या माहेरच्या लोकांनी केला आहे. तिला दोन मुली आहेत तिचे पती माजरी येथे डब्ल्यूसीएल ला कार्यरत आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर भद्रावती पोलिसांना शासकीय रुग्णालय येथून माहिती मिळाल्याचे सांगितले. घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवला. सदर घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.


0 टिप्पण्या