Ticker

6/recent/ticker-posts

जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये कल्पना बांदूरकर यांचे सुयश


चित्रा न्युज ब्युरो
भद्रावती : येथील विवेकानंद माध्यमिक विद्यालयाच्या विज्ञान शिक्षिका सौ. कल्पना विलासराव बांदूरकर यांनी नुकतेच शिक्षण विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर च्या वतीने आयोजित भवानजी भाई चव्हाण हायस्कूल, चंद्रपूर येथे पार पडलेल्या ५२ व्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये घवघवीत यश प्राप्त केले.
शिक्षक निर्मित शैक्षणिक साधने माध्यमिक शिक्षकांच्या गटात विवेकानंद विद्यालयाच्या विज्ञान शिक्षिका सौ. कल्पना विलासराव बांदूरकर ह्यांनी स्वतः तयार करून प्रदर्शनीत सादर केलेल्या अल्प खर्चिक व विद्यार्थ्यांना हाताळण्यायोग्य आणि अध्ययन-अध्यापन पूरक विज्ञान विषयक विविध शैक्षणिक साधनांना प्रथम क्रमांक प्राप्त झाला.
आता त्या दिनांक २८ जानेवारी ते ०१ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनीत सहभागी होतील. 
या दैदिप्यमान यशाकरिता विवेकानंद ज्ञानपीठ कॉन्व्हेंट संस्थेचे अध्यक्ष श्री पुरुषोत्तमजी स्वान, सचिव श्री. अमनजी टेमुर्डे, उपाध्यक्ष श्री. जयंतराव टेमुर्डे, सहसचिव श्री. राजेंद्रजी गावंडे, कोषाध्यक्ष श्री. अभिजित बोथले व इतर पदाधिकारी यांनी कल्पना बांदूरकर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक विजय लांबट, शिक्षक दयाकर मग्गीडवार, आशा गावंडे, तुकाराम पोफळे, संजय आगलावे, लिपिक विनोद गावंडे, रामदास ठक, विश्वनाथ हरबडे, बंडू कांबळे आदींनी कल्पना बांदूरकर यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या