चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपुर / चिमूर :- खड्संगी येथील माहिती अधिकार कार्यकर्ते श्री पंचशील पंढरी वालके यांनी खड्संगी ग्रामपंचायत कार्यालय येथे कार्यालयीन माहिती मिळवण्यासाठी अर्ज केला होता. त्यांच्या अर्जावर कोणतीही कार्यवाही न केल्यामुळे त्यांनी कायद्याप्रमाणे प्रथम अपिलीय अधिकारी यांच्याकडे प्रथम अपील केले होते.
प्रथम अपिलीय आदेश देऊनही कार्यालयीन जन माहिती अधिकारी यानी - ग्रामसेवक यानि कार्यालयातील यांनी माहिती पुरविली नाही. (बेजाबाबदारपणा) शेवटी कायद्याचे कलम १८/१ अनुसार मा. माहिती आयुक्त, नागपुर विभाग यांच्याकडे तक्रार देण्यात आली होती. (तक्रार क्रमांक ३४११/२०२३)
त्या तक्रारीच्या अनुषंगाने जन माहिती अधिकारी ग्रामसेवक ग्रामपंचायत खडसगी यांना रुपये प्रति अर्ज 25000/- एवढा दंड (शास्ती) ठोठावण्यात यावी.
तसेच माहिती मोफत देण्यासंदर्भात देखील आदेश देण्यात आले होते.
ज्यामुळे लोकशाहीला माहिती अधिकार अधिनियम 2005 हा कायदा बळकटी देत आहे हे पुनः एकदा सिद्ध होत आहे.
सदर शास्ती बाबत च्या नोंदी जन माहिती अधिकारी यांच्या सेवाबुकामध्ये नोंद करण्यासाठी पत्रव्यवहार करणार आहे. असेही नागपुर खंडपीठ ला तक्रारी द्वारे पंचशील वालके यानी सांगितले आहे
0 टिप्पण्या