Ticker

6/recent/ticker-posts

प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाधिकारी कार्यालयावर पिंडदान आंदोलन


विजय चौडेकर  जिल्हा प्रतिनिधी,,नांदेड
नांदेड :-दिव्यांग व्यक्तीची संपूर्ण कर्जमाफी झाली पाहिजे, स्वतंत्र घरकुल योजना राबविली पाहिजे, त्यांना राजकीय आरक्षण मिळाले पाहिजे या मुख्य मागणीसाठी शनिवार दिनांक ८ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालया वरती प्रहार दिव्यांग संघटनेच्या वतीने  संवेदनशील सरकारचे पिंडदान आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती माजी मंत्री तथा प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी दिली.
२७ जानेवारी रोजी कन्नड तालुक्यातील त्रिंबक धोत्रे या दिव्यांगाने सुसाईड नोट लिहून व ध्वनीफीत जाहीर करत दिव्यांगांच्या योजनांची अंमलबजावणी होत नसल्याबाबत पैठणच्या जायकवाडी धरणात उडी घेऊन आत्महत्या केली होती.
दिव्यांगांच्या विविध योजना व समस्या बाबत बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार संघटनेने राज्यभर अनेक आंदोलने केली. परंतु महाराष्ट्र शासनाने दखल न घेतल्यामुळेच दिव्यांग त्रिंबक धोत्रे यांना आत्महत्या सारखे पाऊल उचलावे लागले. शनिवार दिनांक ८ फेब्रुवारी रोजी त्रिंबक धोत्रे यांचा तेरावा असल्याने या निमित्ताने त्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्यात यावी, घरकुल योजनेचा लाभ मिळावा, अंतोदय योजनेचा लाभ मिळावा यासह राज्यस्तरीय मागण्याबाबत गांधी पुतळा शहागंज ते छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर असंवेदनशील सरकारचे पिंडदान आंदोलन करण्यात येणार आहे.
माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली शनिवार दिनांक ८ फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजता गांधी पुतळा शहागंज येथून या मोर्चाला सुरुवात होणार असून दुपारी दोन वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर पिंडदान आंदोलन करण्यात येणार आहे.
यावेळी प्रहार दिव्यांग संघटनेचे राज्य अध्यक्ष धर्मेंद्र सातव, राज्य संपर्कप्रमुख रामदास खोत, राज्यसचिव सुरेश मोकल, राज्य उपाध्यक्ष शिवाजी गाडे, लक्ष्मी ताई देशमुख, संजीवनी बारंगुळे, कविता पवार, सुरेखा ढवळे, लक्ष्मण पोकळे, देवदत्त माने, दत्ता भोसले, मयूर काकडे, मोहन मुंडे, रघुनाथ तोंडे हे या आंदोलनाला मार्गदर्शन करणार आहेत.
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील आंदोलन यशस्वी करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर शिंदे, शहर प्रमुख कुणाल राऊत, जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे, जिल्हा संपर्कप्रमुख पारसचंद साकला, जिल्हा सचिव ज्योतीराम जाधव, तालुका अध्यक्ष राजेश जयस्वाल, सचिन गवई, कीर्ती देशपांडे, कन्नड अध्यक्ष गणेश नलावडे, यांच्या संजय मिसाळ,  युसुफ पटेल खुलताबाद, दादासाहेब पाचपुते गंगापूर, गोविंद आप्पा डांगे पैठण, 
दत्ता भाऊ साळकर 
व सर्व ता, अध्यक्ष पदाधिकारी परिश्रम घेत आहेत,,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या