Ticker

6/recent/ticker-posts

उजनीच्या उजव्या कालव्याला पंधरा महिन्यात दुसऱ्यांदा भगदाड मलिदा कोण खातंय याची चौकशी व्हावी : गणेश इंगळे

चित्रा न्युज प्रतिनिधी

सोलापूर जिल्हाला वरदायनी ठरलेल्या उजनी धरणावरील उजव्या कालव्याला 15 महिन्यात दुसऱ्यांदा संगम या ठिकाणी भगदाड पडलं आहे यामुळे कोट्यावधी लिटर पाणी वाया जात आहे .सध्या रब्बी पिकांसाठी पाणी सोडण्यास आधीच उशीर झाला होता आणी आता त्यातच उजनी उजव्या कालव्याची रबर तुटल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी वेळ शेतकऱ्यांन वरती आली आहे. त्यामुळे रब्बी पिकांचे आवर्तन लांबून शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान होऊ शकते . त्यामुळे लवकरात लवर उजनी उजव्या कालव्याच्या कॅनला रबर तात्काळ बसवून पाण्याचे आवर्तन लवकरात लवकर चालू करावे अशी मागणी युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी केली आहे 



उजनी उजव्या कालव्याची रबर पंधरा महिन्यात कशी तुटली हे काम निकृष्ठ दर्ज्याचे करून याचा मलिदा कोण खातंय याची चौकशी करून मलिदा ग्यांग वरती तात्काळ कारवाई करण्यात यावी. ती रबर कोणत्या कंपनी कडून घेतली ती किती निकृष्ट दर्ज्याची होती याची ही सखोल चौकशी वरिष्ट पातळीवरती तात्काळ करण्यात यावी अशी मागणी युवा सेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या